जीएसटी मायग्रेशन मेळाव्याला करदात्यांचा अत्यल्प प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नाशिक - वस्तू व सेवाकर (जीएसटी)संदर्भात केंद्रीय उत्पादनशुल्क विभागाकडे नोंदणीकृत करदात्यांना "जीएसटी'साठी नोंदणी प्रक्रियेविषयी मार्गदर्शनासाठी आयोजित जीएसटी मायग्रेशन मेळाव्याला उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा आज पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. उद्या (ता. 20) मेळाव्याचा अखेरचा दिवस आहे. 

सिडको येथील केंद्रीय उत्पादनशुल्क विभागाच्या कार्यालयासह सिन्नर, धुळे, जळगाव, नगर या ठिकाणी आजपासून दोनदिवसीय जीएसटी मायग्रेशन मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यालयात आज सकाळी केंद्रीय उत्पादनशुल्क विभागाचे आयुक्‍त आर. पी. शर्मा यांच्या हस्ते मेळाव्याचे औपचारिक उद्‌घाटन झाले. या वेळी अतिरिक्‍त आयुक्‍त पंकजा ठाकूर, एस. बी. आकाशी, सहाय्यक आयुक्‍त पी. के. राऊत आदी उपस्थित होते. दरम्यान, विभागाकडे यापूर्वी नोंदणी असलेल्या करदात्यांनी "जीएसटी'साठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दुपारनंतर कार्यालयात शुकशुकाट होता. मेळाव्यात "जीएसटी'साठीच्या नोंदणीकरिता संबंधित कंपन्यांची संपूर्ण माहिती ऑनलाइन भरणे, संचालकांची माहिती छायाचित्रांसह अपलोड करणे, पॅनकार्डची व अन्य महत्त्वपूर्ण माहितीची नोंदणी करणे अशा विविध प्रक्रियेचा समावेश होता. 

अडीचशे जणांचा सहभाग 
मेळाव्यासंदर्भात केंद्रीय उत्पादनशुल्क विभागाने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात आज दिवसभरात या मेळाव्यास अडीचशे करदात्यांनी भेट दिल्याचे नमूद केले. तसेच, जे येऊ शकले नाहीत, अशांना फोनद्वारे मार्गदर्शन करीत जीएसटी नोंदणीची प्रक्रिया गतिशील करण्यासाठी मदत केल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: nashik GST