दुष्काळाच्या प्रश्नावर यंत्रणेने संवेदनशील बनावे : गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नांदगाव तालुक्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशिरा आगमन झाले. त्यामुळे तहसीलमध्ये आयोजित बैठक होणार कि नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला असतांनाच महाजन यांचे आगमन झाले.

नांदगाव : यंदाच्या दुष्काळाची भीषणता काळजीत टाकणारी असून शासन सर्वस्तरावर मदतीसाठी प्रयत्नशील असतांना यंत्रणेने अधिक संवेदनशील बनायची गरज असल्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

नांदगाव-मालेगाव तालुक्याच्या झालेल्या आढावा बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला दिल्यात टँकरने पाणी आणण्याची वेळ येऊ नये. यासाठी पाण्याच्या काटकसरीची गरज असून आठ ते नऊ महिन्याचा कालावधी पाणी उपलब्धतेसाठी संकटकाळ म्हणून सर्वांना सामोरे जावे लागणार असल्याने त्याबाबत गंभीर व्हावे असे आवाहन महाजन यांनी केली. नारपारचे पाणी तालुक्याला मिळावे यासाठीच्या प्रकल्प अहवालात नांदगाव तालुक्याचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती देखील महाजन यांनी दिली. सध्या अन्नधान्याचे संकट नाही, मात्र पाण्याचे संकट आहे त्याचे आव्हान पेलण्यासाठी अधिकाऱ्यांनी कठोर पाऊले उचलावीत असे आदेश त्यांनी दिले.

नांदगाव तालुक्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशिरा आगमन झाले. त्यामुळे तहसीलमध्ये आयोजित बैठक होणार कि नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला असतांनाच महाजन यांचे आगमन झाले. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार पंकज भुजबळ, डॉक्टर राहुल आहेर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुहास कांदे, नगराध्यक्ष राजेश कवडे, पंचायत समितीच्या सभापती विद्यादेवी पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रमोद भाबड, सुभाष कुटे, हरेश्वर सुर्वे समाधान पाटील, सजनतात्या कवडे, दत्तराज छाजेड, भगीरथ जेजुरकर, निलेश चव्हाण, विशाल वडघुले आदींनी तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचे निर्माण झालेले दुर्भिक्ष्य, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, उपाय योजनेबाबत चे अनेक मुद्दे चर्चेला आणले.

आमदार पंकज भुजबळ यांनी तालुका दुःष्काळाने कसा होरपळतोय व पिण्याच्या पाण्यावरच्या आरक्षणाच्या मुद्द्यांचा उहापोह केला. खासदार हरिशचंद्र चव्हाण यांनी तुटीच्या खोऱ्यात पाण्याची निकड व्यक्त केली. दरम्यान, मालेगाव हुन उशिरा आलेल्या पालकमंत्र्यांनी तालुक्यातील वाखारी येथील पिकांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. असता तेव्हा जवळ सांयकाळ होऊन गेल्याने रात्रीच्या अंधारात त्यांनी गट नंबर ५९ मधील तुकाराम व दादाजी काक्लीज यांच्या शेतातील मका, बाजरी, भुईमूंग पिकांची झालेली दुरवस्था बघितली मालेगावहून येताना रस्त्याने पालकमंत्रयांना ठिकठिकाणी पाहणी करण्यासाठी थांबविण्यात येत होते. येवल्याचे प्रांताधिकारी भीमराज दरडी यांनी प्रास्ताविकात नांदगाव व येवला तालुक्याचा आढावा सादर केला. 

Web Title: Nashik guardian minister Girish Mahajan review on drought situation