नाशिक महामेट्रोचे मेट्रो निओ नामकरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी नियोजित नाशिक महामेट्रोचे ‘नाशिक मेट्रो निओ’ असे नामकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशिअल ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली.

नाशिक - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी नियोजित नाशिक महामेट्रोचे ‘नाशिक मेट्रो निओ’ असे नामकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशिअल ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली. 

वाढती सार्वजनिक वाहतूक लक्षात घेता स्मार्टसिटीअंतर्गत मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु ताशी २० हजार प्रवासीक्षमता नसल्याने एलिव्हेटेड बस अर्थात, बॅटरी व इलेक्‍ट्रिकवर आधारित जोड बसगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सीएमओ ट्विटर हॅंडलवरून ही माहिती दिली आहे. २५ मीटर लांबीची २५० प्रवासीक्षमता असलेली ही बस असेल. वाहतुकीचे दोन कॉरिडॉर असतील. त्यात २२ किलोमीटरचा गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर, नाशिक रोड हा एक, तर दहा किलोमीटरचा गंगापूर, जलालपूर, नवश्‍या गणपती, थत्तेनगर, मुंबई नाका असा दुसरा मार्ग असेल. तिसरा मार्ग मुंबई नाका ते सातपूर कॉलनी व्हाया गरवारे असा राहील. सीबीएस हे कॉमन स्टेशन असेल. एकूण २९ स्टेशन्स मार्गावर राहतील. सन २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Mahametro Metroneo