टाईपरायटरची 'टक टक' पुन्हा होतेय सुरू

दिगंबर पाटोळे
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरु करत असताना मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम ता. 30 नोव्हेंबर, 2015 पर्यंत टप्प्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर ता. 30 सप्टेंबर, 2015 च्या शुध्दीपत्रान्वये मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास ता. 31 मे, 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

वणी (नाशिक) : राज्य शासनाने मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास दोन वर्षांची मुदतवाढ दिली असून महाराष्ट्र व गोवा राज्यातील सुमारे चार हजार शासनमान्यता संस्थांमध्ये ता 30 नोव्हेबर, 2019 पर्यंत टंकलेखन मशिनची 'टक टक' पुन्हा सुरु होत आहे.

राज्यातील सर्व शासकीय, निमशासकी कार्यालयातील कामकाजात संगणकाचा वापर तसेच शासनाच्या सर्व विभागामध्ये ई-गव्हर्नन्स, ई-ऑफिस पध्दत अवलंबण्याचे शासनाने स्विकारलेले धोरण विचारात घेऊन राज्यातील शासनमान्य वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय शासनाने 31 ऑक्टोबर, 2013 च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरु करत असताना मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम ता. 30 नोव्हेंबर, 2015 पर्यंत टप्प्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर ता. 30 सप्टेंबर, 2015 च्या शुध्दीपत्रान्वये मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास ता. 31 मे, 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. शासनाने यानंतर पुन्हा ता.13 जुलै, 2016 च्या शुध्दीपत्रान्वये मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास ता. 31 मे, 2017 पर्यंत मुदतवाढ देवून अॉगस्ट १७ मध्ये मॅन्युअल टंकलेखन व लघुलेखनाची परीक्षा घेतली होती. 

यानतंर मॅन्युअल टंकलेखन बंद करण्याच्या शासनाच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात सोलापूर येथील संस्थाचालक जयश्री लगड यांनी याचिका दाखल केली होती. रिट याचिका क्र. 10273/2017 व जनहित याचिका क्र. 100/2016 मध्ये मा. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना त्यांचे म्हणने शासनाकडे सादर करण्याबाबत आदेश दिले होते व शासनाने याचिकाकत्यांच्या निवेदनाबाबत विचारविणीमय करुन निर्णय घ्यावा, असे निर्देश शासनास दिले होते. यानुसार याचिकाकत्यांनी शासनाकडे निवेदने सादर केले होते. तसेच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची काही लोकप्रतिनिधी व संस्थाचालकांनी भेट घेवून निवेदने सादर केली होती.

दरम्यान शासनाने निवेदनाबाबत विचार विनीमय करुन शासन मान्य टंकलेखन व लघुलेखन वाणिज्य संस्थामध्ये ता. 30 नोव्हेबर, 2019 पर्यंत मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम सुरु ठेवण्याचा निर्णय घेत याबाबतचा काल ता. १६ रोजी अद्यादेश काढला आहे. तसेच शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन वाणिज्य संस्थांनी ता. 30 नोव्हेबर, 2019 पर्यंत संगणक टंकलेखनाचा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी आवश्यक बदल करुन घेण्याच्या सुचना केल्या आहेत.  ता. 30 नोव्हेबर, 2019 नंतर संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरु झाल्याचा आढावा घेऊन मॅन्युअल टंकलेखन सुरु ठेवण्याबाबत पुढील निर्णय शासन घेणार आहे. 

दरम्यान नव्याने सुरु झालेल्या संगणक टायपिंग अभ्यासक्रमाबरोबरच मॅन्युअल टायपिंगचाचा टकटकात पुन्हा सुरु होणार असल्याने संस्थाचालक व विद्यार्थ्यांमध्ये समिश्र प्रतिक्रीया उमटत असून काहींनी निर्णयाचे स्वागत तर काहींनी नाराजी व्यक्त होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nashik marathi news manual typewriting courses extended