नवरात्रोत्सवासाठी टिपऱ्या बनवणारी पारधी कुटुंबं दाखल

सोमनाथ कोकरे
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नाशिक : नवरात्रोत्सव जवळ आले की नवनवीन, विविध रंगाच्या टिपऱ्या बाजारात दाखल होतात, म्हसोबा पटांगणावर धुळे जिल्ह्यातील टिपऱ्या तयार करणारी कुटुंबेच्या कुटुंबे पोराबाळांसह दाखल झाली आहेत. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून ही कुटूंबे व करागीर टिपऱ्यांच्या गाठोढ्यांसह येत असतात. ती यावर्षीही दाखल झाली आहेत.

संबंधित फोटो फीचर येथे पाहा

नाशिकपासून गुजरात जवळ असल्याने नवरात्रोत्सवात टिपऱ्या, रास-गरबा खेळण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे टिपऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. कन्सार या लाकडापासुन ते टिपऱ्या तयार करतात. जंगलातील सरळ लाकुडाचे तुकडे करून विविध रंगात रंगवले जातात, त्यावर रंगाच्या रेघा मारुन, ते लाकूड रंगात बुडवून काहींवर रंगीत कागद चिकटवून आकर्षक टिपऱ्या तयार केल्या जातात. शंभर-शंभराचे गठ्ठे बांधुन त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nashik marathi news navratra festival dandia pardhi tribe