नांदगावला एकविरा यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

नांदगाव (नाशिक): शहराची आराध्यदेवता असलेल्या ग्रामदेवता एकविरा देवीच्या यात्रोत्सावास आजपासून प्रारंभ झाला. सकाळी मंदिरातील एकविरेच्या मूर्तीला विधिवत महाभिषेक करण्यात आला. मंदिरापासून देवीच्या मुखवट्यासह पादुकांची पालखीची सवाद्य वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

दुपारी मानाची काठी व त्याला असलेला ध्वजारोहण झाले. मंदिरांच्या पंचाच्या उपस्थितीत दुपारची मुख्य आरती संपन्न झाली. चैत्र पौर्णिमेपासून सुरु झालेला हा यात्रात्सोव आठवडभर चालणार आहे. यानिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी मंदिरात दर्शनसाठी होत आहे. मंदिर परिसरात प्रसाद्विक्री सह विविध साहित्य विक्रीची अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत.  

नांदगाव चे आराध्यदैवत
भगवती श्री एकविरा माता नवसाला पावणारी आहे. अठरा भुजा असलेल्या एकाविरेची धुळ्यात व नांदगाव अशा दोन ठिकाणी मूर्ती आहेत. श्री एकविरा देवीचे मंदिर गावाच्या पश्चिमेला शाखांबरी नदीच्या काठावरील असलेले मंदिर पेशवेकालीन असल्याची आख्यायिका आहे. मंदिराच्या कामातील रेखीवपणा लक्ष वेधून घेतो. मंदिरासमोर भव्य व उंच अशी दगडी दीपमाळ असून, त्याच्या पायाशी गणेशाची मूर्ती मनोहारी अशी आहे.

Web Title: nashik nandgaon ekvira devi yatrostav