नाशिक शहरातील दोन पेट्रोलपंपांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

नाशिक - पेट्रोलपंपांवरील तक्रारीची दखल घेत राज्यात सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत आज ठाणे गुन्हे शोधपथक व जिल्हा पुरवठा विभागातर्फे पेट्रोलपंपांची तपासणी सुरू झाली.

रात्री आठच्या सुमारास दोन्ही विभागांच्या संयुक्त पथकांनी त्र्यंबक चौकातील जे. आर. मेहता ॲन्ड सन्स व दिंडोरी रोडवरील आणखी एका अशा दोन पंपांवर अचानक तपासणी केली. पेट्रोलपंपांचा परिसर ताब्यात घेऊन पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुरवठा विभागाच्या अखत्यारीत इंधनपुरवठा होत असला, तरी इंधनपुरवठ्यातील तक्रारींबाबत दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. 

इंधन गैरव्यवहाराबाबत तक्रारीची दखल घेत राज्यात पंपांवर कारवाई सुरू झाली. जिल्हा यंत्रणांना इंधन कंपन्यांकडून दादच दिली जात नसल्याने गुन्हे शोध विभागाने तपासण्या सुरू केल्या. आजच्या तपासणीत नेमके काय उघडकीस आले, याबाबत दोन्ही यंत्रणा मौनात होत्या. तपासणीनंतर स्पष्ट होईल, असे पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पेट्रोल कमी, हवाच जास्त
शहरातील तपासणी सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणच्या पंपावरील क्‍लृप्त्यांबाबत तक्रारी सुरू होत्या. पेट्रोलऐवजी काही ठिकाणी नुसतीच हवा येत असल्याच्या तक्रारी आहेत. सिडको, नाशिक रोड, पंचवटी, औरंगाबाद मार्गावरील पंपांबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे कुठल्या भागातील पंपाच्या तपासण्या होणार, याविषयी उत्सुकता आहे. मीटरमधील घोळ आणि पेट्रोल कमी व हवाच जास्त ही नाशिकमधील सार्वत्रिक तक्रार असल्याची ओरड आहे. त्यामुळेच तपासणीतील निष्कर्षाबाबत सामान्य ग्राहकांमध्येही कुतूहल आहे.

Web Title: nashik news 2 petrol pump cheaking