सातशे सत्तेचाळीसपैकी दोनशे संगणक नादुरुस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

महापालिकेच्या पेपरलेस कारभाराला ग्रहण

नाशिक - शहराला स्मार्टसिटीकडे नेत असताना कामकाजही स्मार्ट करण्याचे प्रयत्न करणाऱ्या महापालिकेचे माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक वास्तव समोर आले आहे. ७४७ पैकी तब्बल २५ टक्के म्हणजे दोनशे संगणक बंद पडल्याने मानवी पद्धतीने कामकाज करण्याची वेळ आली आहे.

महापालिकेच्या पेपरलेस कारभाराला ग्रहण

नाशिक - शहराला स्मार्टसिटीकडे नेत असताना कामकाजही स्मार्ट करण्याचे प्रयत्न करणाऱ्या महापालिकेचे माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक वास्तव समोर आले आहे. ७४७ पैकी तब्बल २५ टक्के म्हणजे दोनशे संगणक बंद पडल्याने मानवी पद्धतीने कामकाज करण्याची वेळ आली आहे.

महापालिकेतर्फे विविध प्रकारचे ॲप्लिकेशन विकसित केले जात आहेत. कामात सुटसुटीतपणा आणण्याबरोबरच गतिमान कारभार करण्याचा प्रयत्न आहे. नो अवर वर्क्‍स, नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी ऑनलाइन भरण्याची सुविधा, मातृत्व ॲप्लिकेशन, फेसबुक पेज, ट्‌विटर, यूट्यूब या सोशल हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. गतिमान कारभारासाठी महापालिकेने ३४ नागरी सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. त्याद्वारे पंधरा प्रकारच्या परवानग्या दिल्या जातात. संगणकीकरणाच्या दृष्टीने वाटचाल करण्याचे जोरदार प्रयत्न होत असताना, ‘मागे पाठ पुढे सपाट’ अशी परिस्थिती दिसून येते. यापूर्वी खरेदी केलेले संगणक नादुरुस्त झाल्यानंतर ते दुरुस्त करण्याचे भान नसल्याने पेपरलेस कारभाराला ग्रहण लागले आहे. 

शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी संगणक खरेदीसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नामधून संगणकांचे वास्तव समोर आले आहे. तिदमे यांना प्राप्त झालेल्या उत्तरात ७४७ पैकी दीडशे ते दोनशे संगणक नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले आहे. ७४७ पैकी २४९ संगणकांना इंटरनेट सुविधा दिली आहे. ४१८ संगणक लॅन प्रणालीने जोडले आहेत. ६०० संगणकांत ॲन्टिव्हायरस प्रणाली आहे. एका संगणकाला एक हजार १४ रुपये याप्रमाणे सॉफ्टवेअर खरेदी केल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे.

Web Title: nashik news 200 computer close in municipal