‘प्रोजेक्‍ट गोदा’च्या बैठकीला चारच नगरसेवक उपस्थित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

नाशिक - नाशिककरांच्या दृष्टीने स्मार्टसिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘प्रोजेक्‍ट गोदा’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गोदावरीचे सौंदर्यीकरण वाढविण्याबरोबरच धार्मिक व मनोरंजन पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पाची नगरसेवकांना ओळख होऊन नवीन सूचनांचा अंतर्भाव करता येईल का?, या उद्देशाने बोलाविलेल्या बैठकीला केवळ चारच नगरसेवकांनी हजेरी लावली. त्यामुळे गोदाकाठच्या नगरसेवकांची गोदावरीबद्दलची अनास्था दिसून आली. 

स्मार्टसिटी अंतर्गत रेट्रोफिटिंग, पॅनसिटी व ग्रीनफील्ड विकास अशा तीन टप्प्यांत प्रकल्प राबविले जाणार आहेत. रेट्रोफिटिंग अंतर्गत १८ कामांचे दोन पॅकेज आहेत. पहिल्या पॅकेजमध्ये गोदाघाटाचे सौंदर्यीकरण केले जाईल.

यात गोदाघाटाला पौराणिक लूक देण्यासाठी दगडी पेव्हर ब्लॉक, दगडी बाक बसविले जाणार आहेत. तसेच सायकल ट्रॅक, पदपथ, नामफलक, वृक्षारोपण, कारंजानिर्मिती. दुसऱ्या पॅकेजमध्ये नदी स्वच्छता, अहिल्यादेवी होळकर पुलाखालील बंधाऱ्यांच्या गेटवर स्वयंचलित यांत्रिकी दरवाजे, हनुमान घाट ते रामवाडीदरम्यान पूल, चिंचबन ते हनुमानवाडी पादचारी पूल, तसेच अरुणा व वाघाडी नदीसाठी वळणघाट आदी १८ कामे केली जाणार आहेत. ‘प्रोजेक्‍ट गोदा’अंतर्गत ५१२ कोटींची कामे केली जाणार आहेत. या कामांना लवकरच सुरवात होणार असून, त्यासाठी गोदाकाठच्या नगरसेवकांना कामांची माहिती व्हावी व त्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात प्रकल्प सादरीकरणासाठी बैठक बोलाविली होती. प्रकल्पांतर्गत गोदावरीचे सौंदर्यीकरण होणार असल्याने नगरसेवकांनी बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे असताना केवळ चारच नगरसेवक उपस्थित होते. महापौर रंजना भानसी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, सुनीता पिंगळे याव्यतिरिक्त अन्य नगरसेवकांनी मात्र बैठकीकडे पाठ फिरविली.

Web Title: nashik news 4 corporator present for project goda meeting