भीषण अपघात चार जण ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

नाशिक - दिंडोरी रोडवरील मेहता फोर्स कंपनीसमोर चारचाकी वाहन झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये चौघे जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. आज पहाटे हा अपघात घडला. मृतांमध्ये एका युवतीचा समावेश आहे.

सकाळी दिंडोरीकडून नाशिककडे भरधाव येत असलेले चारचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळले. या धडकेमुळे गाडीत बसलेले रामअवतार सूरजसिंग कुमावत (वय 52), मनोहर दुर्गाराम जनगिड (वय 57), संतोषीदेवी मनोहर जनगिड (वय 52) आणि गुडिया रामअवतार कुमावत (वय 15) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Web Title: nashik news 4 death in accident