नाशिक: पिंपळगाव बसवंत येथे अल्पवयीन मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

पिंपळगाव बसवंत येथील इस्लामपूर परिसरात लुकमान पिंजारी कुटूंबिय राहतात. लुकमान पिंजारी यांचा पाच वर्षीय मुलगा साहिल शनिवारपासून बेपत्ता होता. त्यासंदर्भात पिंपळगाव बसवंत पोलिसात तक्रारही दाखल आहे. दरम्यान काल रात्री साहिल याचा मृतदेह आढळून आला.

नाशिक - पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील अल्पवयीन मुलाचे शेजारीच राहणाऱ्या युवकाने अपहरण केले. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करून त्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित युवकाला त्याच्या आईसह पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामुळे पिंपळगावच्या इस्लामपूर परिसरात तणावाची परिस्थिती आहे. 

पिंपळगाव बसवंत येथील इस्लामपूर परिसरात लुकमान पिंजारी कुटूंबिय राहतात. लुकमान पिंजारी यांचा पाच वर्षीय मुलगा साहिल शनिवारपासून बेपत्ता होता. त्यासंदर्भात पिंपळगाव बसवंत पोलिसात तक्रारही दाखल आहे. दरम्यान काल रात्री साहिल याचा मृतदेह आढळून आला. परिसरातील नातलगांनी तपास केला असता, पिंजारी यांच्याच शेजारी राहणाऱ्या युवकाने साहिलचे अपहरण केल्याचे समोर आले. त्यानेच साहिलवर अनैसर्गिक कृत्य केले आणि त्याचा गळा आवळून खून केला. त्यामुळे संतापलेल्या जमावाने संशयित युवकाला बेदम मारहाण केली. परंतु वेळीच पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संशयित युवकाला त्याच्या आईसह ताब्यात घेण्यात आले आहे.

युवकाला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, सदरील युवकाची आई ही जादूटोणा करीत असल्याने या घटनेमागे जादूटोण्याचा प्रकार आहे काय, या शोध पोलीस घेत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
खेड: जगबुड़ी, नारंगी नदीला पूर​
सह्याद्री सायकलिस्टने अमेरिकेत फडकविला तिरंगा
ट्रम्प यांनी मोडली व्हाईट हाऊसमधील "इफ्तार' परंपरा...
शेतकरी व शिवसेना एकत्र आल्यामुळे कर्जमुक्ती- उद्धव ठाकरे​
नितीशकुमारांचे अपने रंग हजार ....​
काळाकुट्ट २५ जून अन्‌ बिनचेहऱ्याचा प्रकाश!​
फेसबुकवरही "विराट'चे विराटप्रेमी​
भारताचा विंडीजवर 105 धावांनी विजय​
सरकारचे तोंड शेतकऱ्यांकडे वळविले - खोत​

Web Title: Nashik news 5 year child murder in Pimpalgaon Baswant