मुंबई जलमय झाल्याने 800 टन कोंबड्या थांबल्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नाशिक - मुंबई जलमय झाल्याने राज्याच्या विविध भागांतून पाठवण्यात येणाऱ्या 800 टन ब्रॉयलर कोंबड्या दोन दिवसांमध्ये थांबल्या आहेत. हैदराबादमध्ये 75 रुपये किलो या भावाने कोंबडी विकली जात असल्याने मराठवाड्यातील व्यापाऱ्यांनी राज्यातून कोंबडी खरेदीला पसंती दिली आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये 54 ते 55 रुपये किलोवरून ब्रॉयलर कोंबडीचा भाव 64 रुपयांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. अशातच पावसामुळे रस्ते बंद पडल्याने उत्पादकांनी मुंबईकडे कोंबड्या पाठवण्याकडील हात आखडता घेतला आहे. दिवसाला 800 टन कोंबड्या मुंबईकरांसाठी पाठवल्या जातात; पण काल आणि आज त्यातील पन्नास टक्के कोंबड्या विक्रीसाठी मुंबईला पाठवण्यात आल्या आहेत, असे आनंद हॅचरीजचे संचालक उद्धव आहेर यांनी "सकाळ'ला सांगितले.

Web Title: nashik news 800 tone hen stop by mumbai rain water

टॅग्स