शहरात १७ नवीन आधारकार्ड नोंदणी केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

नाशिक - नागरिकांना आधारकार्ड काढण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली असून, शहरात १७ नवीन आधारकार्ड नोंदणी केंद्रांना मंजुरी दिली. यामुळे आता नवीन आधारकार्ड बनविण्यासह आधार लिंकच्या कामांना वेग येईल.

नाशिक - नागरिकांना आधारकार्ड काढण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली असून, शहरात १७ नवीन आधारकार्ड नोंदणी केंद्रांना मंजुरी दिली. यामुळे आता नवीन आधारकार्ड बनविण्यासह आधार लिंकच्या कामांना वेग येईल.

केंद्र सरकारने ओळखपत्र म्हणून आधारकार्ड सक्तीचे केले आहे. शासकीय कामांसह व्यवहार व इतर अनेक कामांसाठी आता आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. यामुळे आधारकार्ड काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, शहरातील आधारकार्ड केंद्रांची संख्या लक्षात घेता नागरिकांना आधारकार्ड केंद्र शोधण्यापासून ते मिळविण्यापर्यंत समस्यांना तोंड द्यावे लागते. आधारकार्डमध्ये काही दुरुस्तीसाठी नागरिकांना केंद्राची शोधाशोध करावी लागते. अपुऱ्या केंद्रांमुळे कर्मचाऱ्यांविरुद्ध नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या होत्या. शहरातील आधारकार्ड केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येत होती. 

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने शहरात १७ नवीन आधारकार्ड केंद्रे सुरू करण्यास मंजुरी दिली. जिल्ह्यात किमान ६८ आधारकार्ड केंद्रे असावीत, असे निर्देश असतानाही जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सोयीसाठी १७ केंद्रे सुरू करणार आहे. लवकरच ही केंद्रे शहरात सुरू होतील. यामुळे नागरिकांच्या समस्या सुटून त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लागतील. 

आधारकार्ड केंद्रे अशी
सिद्धिविनायक मंदिर, एमएसईबी कॉलनी (जेल रोड), उपकार्यालय म्हसरूळ मनपा शाळा (पंचवटी), मायको दवाखाना आरोग्य हजेरी शेड (पंचवटी), महापालिका विभागीय कार्यालय (मालेगाव बसस्थानक), उपकार्यालय नांदूर मनपा शाळा (पंचवटी), श्रीराम सार्वजनिक वाचनालय (गणेशवाडी, पंचवटी), तारांगण (त्र्यंबक रोड), धान्यबाजार (मनपा शाळा), मनपा शाळा शॉपिंग सेंटर (आनंदवली), मनपा शाळा क्रमांक ९९ (सातपूर), मनपा शाळा क्रमांक २२ (विश्‍वासनगर, सातपूर), सेतू कार्यालय (सातपूर), जाधव टाउनशिप मनपा शाळा क्रमांक ४ (अंबड- सातपूर लिंक रोड), मनपा शाळा क्रमांक ३ व २०, रायगड चौक (सिडको), मनपा शाळा क्रमांक १०७ महाकाली मैदानाशेजारी तोरणानगर, मनपा शाळा क्रमांक ८३ व ९९ (पाथर्डी), मनपा शाळा क्रमांक १५ व ७९ ( चेहेडी बुद्रुक, नाशिक रोड), माडसांगवी मंडल अधिकारी कार्यालय.

Web Title: nashik news aadhar card