जिल्ह्याला आणखी 18 नवीन आधार केंद्राचे किट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नाशिक - राज्यात देशात जवळपास सर्वच आधार नोंदणी केंद्र पुढील तीन-चार दिवस बंद राहणार असली, तरी नाशिकला मात्र, वाढीव आधार केंद्राची लॉटरी लागली  आहे. यूआयडीने नाशिकला आणखी 18 केंद्राचे किट उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यात आधार केंद्राची संख्या 139 वर पोचली असून, प्रशासनाने 24 केंद्रांचे अद्यावतीकरण सुरू केले.

येत्या 31 मार्चपर्यंतच बॅंक खात्यांसह सर्वच शासकीय योजनांसाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले. सोबतच बोटावरील रेषा पुसट होत असल्याने आधार नोंदणीत सामान्यांचा चेहरा समाविष्ठ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. राज्यात आणि देशात जवळपास सगळीकडेच आधार केंद्र बंद आहेत. पण नाशिक याला अपवाद ठरले आहे. येथील वाढत्या तक्रारी आणि आहे त्या केंद्रावरील आधार दुरुस्ती व नोंदणीसाठी पहाटेपासून होणारी गर्दी यामुळे यूआयडीने जिल्ह्याला आणखी नवीन 18 किट उपलब्ध करून दिले. यूआयडीकडून मिळालेले नवीन 18 किट मंजूर झाले असले, तरी अद्याप हे किट ऍक्‍टिवेट झालेले नाहीत. जिल्ह्यास यापूर्वी 121 किट होते. त्यापैकी नाशिक शहरात 32 किट आहे. नवीन आठ 
किट मिळाल्याने शहरात 40 किट होणार आहे. 

Web Title: nashik news aadhar card