आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांचे काय होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

कर्जमाफीसाठी 10 लाख 22 हजार अर्ज
नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेसाठी राज्यातून 56 लाख 59 हजार, तर उत्तर महाराष्ट्रातून 10 लाख 22 हजार 673 शेतकऱ्यांनी कर्जमाफी अर्ज भरले आहेत. त्यापैकी तब्बल 45 हजारांहून अधिक अर्जांसोबत आधार लिंक नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे काय होणार असा प्रश्‍न आहे.

कर्जमाफीसाठी 10 लाख 22 हजार अर्ज
नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेसाठी राज्यातून 56 लाख 59 हजार, तर उत्तर महाराष्ट्रातून 10 लाख 22 हजार 673 शेतकऱ्यांनी कर्जमाफी अर्ज भरले आहेत. त्यापैकी तब्बल 45 हजारांहून अधिक अर्जांसोबत आधार लिंक नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे काय होणार असा प्रश्‍न आहे.

कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यासाठी मुदत संपली असून, उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहे. त्यात, नगर जिल्ह्यातून सर्वाधिक 3 लाख 34 हजार 920 शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातून 2 लाख 80 हजार 270 तर नाशिक जिल्ह्यातून 2 लाख 64 हजार 756 शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. धुळे जिल्ह्यात 93 हजार 549 तर नंदुरबार जिल्ह्यातून 49 हजार 178 इतक्‍या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले आहेत. सर्वाधिक अर्ज नगर जिल्ह्यातून भरले गेले आहे. उत्तर महाराष्ट्रच नव्हे तर राज्यातील ही संख्या विक्रमी आहे.

आधारपासून सुरवात
प्रत्येक शासकीय कामकाजासाठी आधार केंद्रबिंदू मानले जात असले, तरी अद्याप हजारो शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अर्जाला आधार लिंक नाही. आधारच नसलेल्या शेतकरी कर्जमाफी अर्जाची वेगळी नोंद घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रात ही संख्या 45,143 एवढी आहे, तर सगळ्या राज्यात 2 लाख 41 हजार 628 शेतकऱ्यांच्या अर्जाला आधार नाही. विभागात नाशिक 9,215, नंदुरबार 2,022, धुळे 4,561, जळगाव 9,495 तर नगर जिल्ह्यात 19,820 इतकी आधार नसलेल्यांची संख्या आहे. पुढच्या टप्प्यात आता अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंकांकडूनही माहिती संकलित केली जाणार आहे. साधारण प्रत्येकी अर्जापोटी साधारण 66 कॉलम इतकी माहिती बॅंका त्यांच्या अर्जाद्वारे भरणार आहेत. त्यानंतर कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी बॅंकांचे कामकाज पूर्ण होणार का, तसेच दिवाळीत कुणाला कर्जमाफी मिळणार याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: nashik news aadhar card link farmer