तिहेरी अपघातात पिंपळगावला एक ठार; दोन गंभीर जखमी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

पिंपळगाव बसवंत - येथील मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक-कार व दुचाकीच्या तिहेरी अपघातात एक ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. नादुरुस्त ट्रक महामार्गाच्या मध्ये उभा असल्याने ही विचित्र दुर्घटना घडली. मालेगावकडून पिंपळगावच्या दिशेने ट्रक (यूपी 78, सीटी 3454) येत असताना महामार्गावरील जलसा हॉटेलजवळ नादुरुस्त झाला. चालकाने ट्रकच्या बाजूला इतर वाहनांना सूचना देण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नव्हती. शिवाय ट्रक हा जलदगती मार्गावर उभा होता.

दुपारी अडीचच्या दरम्यान सुनील माधव शिंदे हे पत्नी भारती शिंदे (रा. जेल रोड, नाशिक) हे कार (एमएच 15, एफएफ 0624) ने शिरवाडेकडून नाशिकला जात होते. समोर उभ्या असलेल्या ट्रकबाबत अनभिज्ञ असल्याने सुनील शिंदे यांना कारचा वेग नियंत्रित करता आला नाही. भरधाव आलेली कार उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार आदळली. ही धडक एवढी जोरदार होती, की वरच्या बाजूने कार कापली गेली. कार ट्रकवर आदळून पाठीमागून येणाऱ्या सुनील घडवजे यांच्या मोटारसायकला धडकली. या विचित्र अपघातात कारचालक सुनील शिंदे (वय 54 वर्षे) हे डोक्‍याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले, तर भारती शिंदे व मोटारसायकलस्वार घडवजे जबर जखमी झाले आहेत. पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, पोलिस हवालदार पंडित वाघ तपास करीत आहेत. 

Web Title: nashik news accident