नाशिक: मुलाला विमानतळावर सोडून परतताना अपघात; 2 ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

गगराणी यांचा मुलगा व सून अमेरिकेत राहत असुन ते मुलगा व सून यांना मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी गेले होते. तेथून घराकडे परतताना हा अपघात झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : क. का. अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर तवेरा मोटार गॅस टँकरवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात दोन ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये पुष्पा देवकिसन गगराणी (रा. मालेगाव), तवेरा चालक (नाव समजले नाही) हे दोघे ठार झाले आहेत. तर देवकिसन गगराणी हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना अपोलो रूग्णालयात दाखल केले आहे.

गगराणी यांचा मुलगा व सून अमेरिकेत राहत असुन ते मुलगा व सून यांना मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी गेले होते. तेथून घराकडे परतताना हा अपघात झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Nashik news accident in nashik 2 dead