मालेगाव: दुचाकीला कंटेनरची धडक, तीन ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

महामार्गावर येथे उड्डाणपुल व भूमीगत रस्ता आवश्यक आहे. पुल मंजूर असूनही झालेला नाही. पुल तातडीने करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी रात्री रास्तारोको सुरू केला. येथे अपघातात यापूर्वी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यावेळी वारंवार आंदोलन झाल्यानंतर फक्त गतीरोधक करण्यात आली.

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर टेहरे फाट्यावर कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. यात तीन जण जागीच ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये दुचाकीवरील दोन बालकासह दुचाकीस्वाराचा समावेश आहे. बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातानंतर संतप्त टेहरे ग्रामस्थांनी महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. या अपघातात संजय अर्जुन पवार (34, रा. आदीवासी वस्ती, मालेगाव) हा दुचाकीस्वार व मयताचे भाचे अवि विजय जाधव (13) व क्रुषीकेश राजेंद्र जाधव (9 दोघे रा. टेहरे) हे ठार झाले. दुचाकीने (एमएच-41-एम 2745) रस्ता ओलांडत असतांना कंटेनरने धडक दिली. दोघा बालकांचा मृतदेह तातडीने सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. संजय व दुचाकी कंटेनरखाली अडकले. त्यांना काढण्याचे प्रयत्न सुरू होते. छावणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

महामार्गावर येथे उड्डाणपुल व भूमीगत रस्ता आवश्यक आहे. पुल मंजूर असूनही झालेला नाही. पुल तातडीने करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी रात्री रास्तारोको सुरू केला. येथे अपघातात यापूर्वी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यावेळी वारंवार आंदोलन झाल्यानंतर फक्त गतीरोधक करण्यात आली. मात्र यानंतरही अपघातांना आळा बसलेला नाही. ग्रामस्थांनी कंटेनर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समजते.

Web Title: Nashik news accident near Malegaon 3 dead