नगर दारूकांडातील आरोपीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

नाशिक - नगर जिल्ह्यातील पांगारमल येथील दारूकांडप्रकरणी मोकाअंतर्गत अटकेत असलेला प्रमुख आरोपी मोहन दुग्गल (वय 64) याचा नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात शनिवारी (ता. 24) सायंकाळी मृत्यू झाला. पांगारमल गावात गेल्या वर्षी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दुग्गल याने बनविलेली दारू प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या चौकशीत दुग्गल याच्यासह त्याचा मुलगा सोनू व इतर 20 जणांवर मृत्यूला जबाबदार धरून गुन्हा दाखल झाला.
Web Title: nashik news accused death