संतप्त पालकांचे आदिवासी आयुक्तालयाला टाळे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

नाशिक - नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळण्याचा हट्ट धरलेल्या पालकांनी आदिवासी विकास आयुक्तालयाला टाळे ठोकत जोरदार घोषणाबाजी केली. अनुसूचित जमातीमधील अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळाला नाही, तर उद्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप ठोकून अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्तालयात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारादेखील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने देण्यात आला. 

नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या पहिलीच्या प्रवेशासाठी नाशिक प्रकल्प कार्यालयात एकूण 586 अर्ज दाखल झाले होते. जागेच्या उपलब्धतेनुसार प्रकल्प कार्यालयाकडून 206 विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला होता. सोमवारी 206 विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयाकडून शाळेत पोचविण्यात आले. प्रवेश प्रक्रियेत 380 विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी आदिवासी विकास परिषदेचे नाशिक अध्यक्ष लकी जाधव यांनी थेट आदिवासी आयुक्तालयात पहिलीचा वर्ग भरवीत रात्रभर आदिवासी आयुक्तालयाबाहेर मुक्काम ठोकला. चोवीस तास उलटूनही कुठलीच कारवाई होत नसल्याने आज सकाळी संतप्त पालकांनी आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत आयुक्तालयास टाळे ठोकले. विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही, तर उद्या (ता. 20) एकाही अधिकारी व कर्मचाऱ्यास आयुक्तालयात पाय ठेवू न देण्याचा इशारा दिला.

Web Title: nashik news adivasi school