आदिवासी विद्यार्थ्यांचे भरपावसात ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

नाशिक - आदिवासी विकास विभागाच्या जिल्हाभरातील वसतिगृहांत रविवारी भोजन ठेकेदारांनी बिल रखडविल्याच्या मुद्द्यावरून जेवण न देता विद्यार्थ्यांना उपाशी ठेवण्याचा प्रकार घडला. सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी उपाशी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास भवन गाठत पावसात आंदोलन केले. 

बिल थकल्याने भोजन ठेकेदारांनी आजपासून चाळीस वसतिगृहांत भोजन थांबविले. यामुळे दिवसभर विद्यार्थी उपाशी होते. आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळताच पर्यायी व्यवस्था म्हणून सेंट्रल किचनचे जेवण दिले. परंतु, ते घेण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिला. भोजन ठेका चालू करून त्याद्वारे जेवण मिळावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. आंदोलनात आठवी ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली मुले व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

Web Title: nashik news adivasi student rain

टॅग्स