खामखेडा परिसरात मजूरांची मोठ्या प्रमाणात टंचाई

file photo
file photo

खामखेडा (नाशिक): यावर्षी परतीच्या पावसाने मका तशेच इतर पिकं काढणीला उशीर झाला. त्यामुळे दिवाळी झाल्यावर मका तसेच पावसाळी कांदा लागवड, निंदनी व सध्या उन्हाळ कांदा लागवड हि सर्वच काम सोबत आल्याने आता मजूर टंचाई ही नवीन समस्या शेतकऱ्यांपुढे उभी आहे. जास्तीची मजुरी देऊनही मजूर मिळेनासे झाले आहेत. यापुढे शेती करणे मोठे आव्हान झाले असल्याचे शेतकऱ्यांची अवस्था आहे.

शेती कामासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज असते. कांदा, ऊस, मका अशा सर्वच पिकांना लागवडी पासून निंदनी, मशागत, कापणी अशा कामांसाठी मजुरांची आवश्यकता असते. जास्त क्षेत्र असणाऱया शेतकऱ्यांसह कमी क्षेत्र असणाऱया शेतकऱयांनाही सध्या मजूर टंचाइने ग्रासले आहे. स्थानिक मजूर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकर्यांना बाहेर गावाहून मजुरांची ने आन करावी लागत आहे. सध्या रांगडा तसेच उन्हाळ कांदा लागवड, लाल कांदा काढणी-निंदनी यासाठी मजुराची मोठ्या प्रमाणावर टंचाई खामखेडा व परिसरात भासत आहे

बाहेरून मजुरांची ने-आण
ज्या भागात शेतीला भरपूर पाणी आहे, अशा भागात स्थानिक मजूर मिळत नसल्याने शहरी, निमशहरी तसेच आदिवासी वसाहती जास्त असलेल्या वाड्या वस्त्या, पाड्या या भागातून मजूर आणावे लागतात. वाहनांद्वारे त्यांची ने-आण करावी लागते. गावागावांत मजूर मिळत नसल्याने हा पर्याय निवडल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने मका पिक दिवाळी पर्यंत उभे होते. त्यामुळे हे पिकं आवरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज भासते. कांदा, मका हि पिकं कमी पिकांना आवरणे शक्य नसते. त्यामुळे प्रत्येकच शेतकरी मजुरांवर विसंबून असतो. पावसामुळे कांदा लागवड व इतर कामे बरोबरच आल्याने हि कामे आवरण्यासाठी सध्य स्थितीत शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई जाणवत आहे.

जास्तीचे पैसे देऊनही मजुरांची ना
सध्य स्थितीत जास्तीचे पैसे देऊनही मजूर मिळत नाहीत. आहे ते मजूर काम करण्यास येत नाहीत. अनेक मजुरांना दहा ते पंधरा हजाराची उचल द्यावी लागते, तरीही एन वेळेस महत्वाच्या कामाला मजुरांकडून खो दिला जातो. त्यामुळे सध्या अवाच्या-सव्वा मजुरी देवूनही मजूर मिळेनासे झाले आहेत.

वाहनाचा खर्च, मजुरीही रोख
मजूर टंचाईमुळे मोठ्या गावांतून मजूर आणावे लागतात. त्यांना जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र गाडी करावी लागते. मजूर ने-आन करणाऱ्या वाहनाची भाडे रोखीने द्यावे लागते. तसेच मजुरीही रोख द्यावी लागत आहे. काम लवकर व्हावे म्हणून शेतकरी वाहनांचा खर्च अंगावर घेत काम आवरत आहेत.

पैसाही जातो अन्‌ कामही समाधानकारक होत नाही
मजुरी दरवर्षी वाढते. त्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढत नाहीत. जास्तीची मजुरी देऊनही काम मनासारखे होत नाही. मजूर वेळे पेक्षा उशिराने शेतात हजर होतात व वेळे आधीच शेतातून घरी जाण्यासाठी घाई करतात. यामुळे मनाजोगे काम होत नाही. सध्या खामखेडा, सावकी, भऊर विठेवाडी, पिळकोस परिसरात उन्हाळ कांदे लागवडीस मजूरांची टंचाई भासत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com