पावसाची हजेरी लागूनही खरीप पेरण्यांचा वेग संथ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

नाशिक - राज्यात यंदा पावसाची चांगली हजेरी लागली असली, तरीही खरीप पेरण्यांचा वेग धीमा आहे. त्यामध्ये अन्नधान्य अन्‌ तेलबियांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत 2 टक्के पेरण्या उरकल्या आहेत. यंदा जूनच्या सरासरीच्या 88.1 टक्के पाऊस झाला असून गेल्या वर्षी जूनच्या मध्यापर्यंत 32.8 टक्के पाऊस झाला होता. तसेच पेरण्या 2.1 टक्के क्षेत्रावर पूर्ण झाल्या होत्या. 

जूनच्या सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत आतापर्यंत विभागनिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून (कंसात विभागातील गेल्यावर्षीच्या पावसाची टक्केवारी दर्शवते) ः कोकण- 73.1 (29.3), नाशिक- 124.4 (11.6), पुणे- 88.6 (68.2), औरंगाबाद- 163.9 (48.7), अमरावती- 104.3 (25), नागपूर- 35.9 (22). गेल्या चोवीस तासामध्ये राज्यात सरासरी 3.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरसकट पीककर्ज माफी आणि हमीभावासाठी शेतकरी संप, महाराष्ट्र बंद या आंदोलनात शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतरही खरिपासाठीच्या अर्थसाह्याचा प्रश्‍न लोंबकळत राहिला. या साऱ्या कारणांमुळे खरिपाच्या पेरण्यांना फारसा वेग आला नसल्याचे मानले जात आहे. 

मक्‍याची वाढ आशादायक 
पीकपद्धतीतील बदलामध्ये शेतकऱ्यांनी मक्‍याला "कॅशक्रॉप' म्हणून प्राधान्य देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात आतापर्यंत गेल्या वर्षीचा विचार करता, मक्‍याच्या क्षेत्रातील वाढ आशादायक आहे. गेल्या वर्षी जूनच्या मध्यापर्यंत 5 हजार 698 हेक्‍टरवर लागवड झाली होती. हे क्षेत्र यंदा 47 हजार 833 हेक्‍टरपर्यंत पोचले आहे. तूर, मूग, उडदाच्या 24 लाख 50 हजार हेक्‍टर या उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत 16 हजार 724 हेक्‍टरवर लागवड झाली आहे. मात्र तुरीचे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा किंचितसे अधिक आहे.

Web Title: nashik news agriculture rain farmer