वातानुकूलित रेल्वे प्रवास महागला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

खाद्यपदार्थांना सूट, मात्र खाद्य पुरविणाऱ्या सेवा महाग
नाशिक - रेल्वेच्या प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित प्रवासावर 0.5 टक्के जीएसटी आकारणी सुरू झाली आहे. पूर्वीच्या (4.5 टक्के) सेवाकराऐवजी 5 टक्के जीएसटी

खाद्यपदार्थांना सूट, मात्र खाद्य पुरविणाऱ्या सेवा महाग
नाशिक - रेल्वेच्या प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित प्रवासावर 0.5 टक्के जीएसटी आकारणी सुरू झाली आहे. पूर्वीच्या (4.5 टक्के) सेवाकराऐवजी 5 टक्के जीएसटी

लागू झाला आहे, त्यामुळे वातानुकूलित रेल्वे प्रवास आणि माल वाहतूक महागली आहे. खाद्यपदार्थांवर कर नसला, तरी खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या सेवा मात्र महागल्या आहेत.

परिणामी, वातानुकूलित डब्यातील खाद्यपदार्थ महागले आहेत.
मात्र, द्वितीय श्रेणी, मेट्रो, स्लीपर कोच, रेल्वेची शेती उत्पादनासह दुग्धजन्य वाहतूक, दुग्धजन्य पदार्थ, मीठ, धान्ये, डाळी व तांदूळ, तसेच रेल्वे उपकरणांची वाहतूक, संरक्षण, लष्करी उपकरण वाहतुकीत फरक नाही. रेल्वे तिकिटावर सेवाकराच्या जागी वस्तू व सेवाकर (जीएसटी) लावला आहे. वातानुकूलित प्रथम श्रेणी, कार्यकारी वर्ग, एसी -2 टायर क्‍लास, एसी -3 टायर, एसी चेअर कार क्‍लास, एसी इकॉनॉमी क्‍लास, प्रथम श्रेणी, एसी आणि प्रथम एफटीआरवर विशेष गाड्या, डबेचे क्‍लासचे कोच प्रकारच्या वातानुकूलित प्रवासावर नवा कर आकारला जाईल. त्यामुळे रेल्वेचा वातानुकूलित प्रवास जीएसटी लावल्याने आधीच्या 4.5 टक्के सेवाकराऐवजी फक्त 0.5 टक्के वाढविल्याने अर्ध्या टक्‍क्‍याने महागला आहे.

खाद्यपदार्थांवर सवलत असल्याचे सांगितले जात असले, तरी खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सेवांवर कर लावल्याने थेट खाद्यपदार्थांवर कर न लावूनही पदार्थ महागणार आहेत.

वातानुकूलित डब्यातील खाद्यपदार्थांसाठी वातानुकूलित सेवा असतात. थंड किंवा अन्न गरम करण्यासारख्या सेवा आहेत, त्यावर इनपुट टॅक्‍सक्रेडिट (आयटीसी) सह 12 टक्के वर्षासाठी, तसेच कायमस्वरूपी वातानुकूलन किंवा केंद्रीय गरम करण्याची सुविधा असलेल्या स्टॅटिक युनिट्‌सकरिता- पूर्ण इनपुट टॅक्‍स क्रेडिट (आयटीसी) सह 18 टक्के कर आहे. राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि इतर मेल, एक्‍स्प्रेस गाड्यांसाठी- पूर्ण इनपुट टॅक्‍स क्रेडिटसह 18 टक्के (आयटीसी) आहे. तेजस, गतिमान, शिवलिक या प्रीमियम गाड्यांच्या खानपान सेवेवर जीएसटी 18 टक्के आकारला जाईल. केटरिंग शुल्कावर वरील जीएसटी लागू आहे. पण, त्याचवेळी मेल किंवा एक्‍स्प्रेस, तसेच सामान्य गाड्यांतील खर्च मात्र वाढणार नाही.

मालवाहतुकीवर कर आकारणी
रेल्वेने पार्सल वाहतुकीवर सेससह सेवाकराच्या जागी जीएसटी आकारला आहे; पण त्यात कर आकारणी करताना प्रवाशाच्या सोबत निर्धारित केलेले स्वतःचे प्रवाशी बॅगांचे सामान असल्यास त्यावर जीएसटी नसणार; पण प्रवाशांशिवाय रेल्वेने वाहतुकीसाठी जो माल पाठविला जाईल, त्यावर जीएसटी लागू असेल. त्यामुळे रेल्वेद्वारे पार्सल वाहतुकीवर जीएसटी लागू असेल. सार्वजनिक मालवाहतुकीत पुन्हा काही बाबी वगळल्या आहेत. त्यात, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती, अपघात किंवा दुर्घटनाग्रस्त व्यक्तींसाठी मदत सामग्री, लष्कराचे साहित्य, नोंदणीकृत दैनिक, मासिके, रेल्वे उपकरणे किंवा साहित्य, शेती उत्पादन, दूध, मीठ आणि धान्ये, डाळी आणि तांदळासह अन्नधान्य आणि सेंद्रिय खतांवर कर नसेल. रासायनिक खतांवर मात्र कर असेल.

Web Title: nashik news air-conditioned train travel expensive