अमरधामची दुर्दशा थांबवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जुने नाशिक - शहरातील मुख्य स्मशानभूमी अमरधाममध्ये महापालिकेकडून विद्युतदाहिनी बसविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यापूर्वी स्मशानभूमीची झालेली दुर्दशा थांबवा, अशी मागणी नगरसेवक शाहू खैरे यांनी केली. 

जुने नाशिक - शहरातील मुख्य स्मशानभूमी अमरधाममध्ये महापालिकेकडून विद्युतदाहिनी बसविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यापूर्वी स्मशानभूमीची झालेली दुर्दशा थांबवा, अशी मागणी नगरसेवक शाहू खैरे यांनी केली. 

शहरातील मुख्य स्मशानभूमी असलेल्या जुने नाशिक येथील अमरधाममध्ये स्मार्टसिटी अंतर्गत कामांच्या माध्यमातून विद्युतदाहिनी बसविण्यात येणार आहे. दुसरीकडे स्मशानभूमीचे पत्रे तुटले आहेत. त्यातून पावसाचे पाणी, कचरा नागरिकांच्या अंगावर पडतो. परिसरातील कचऱ्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठीची आसनव्यवस्था अपुरी आहे. अशा विविध समस्यांमुळे अमरधाम समस्यांचे माहेरघर बनले आहे. अशा वेळेस येथील समस्या सोडविणे महत्त्वाचे आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेने प्रथम अमरधामला समस्यामुक्त करावे, त्यानंतर तेथे विद्युतदाहिनी बसवावी, अशी मागणी शाहू खैरे यांनी केली. अमरधामकडे जाणाऱ्या मार्गावर पावसाचे किंवा पुराचे पाणी जमा झाल्यास अंत्यविधीसाठी जुने नाशिकला वळसा घालून  अमरधाममध्ये जावे लागते. त्यामुळे या मार्गाची उंची वाढवून तो मार्ग कन्नमार पुलाला जोडावा. त्यामुळे अमराधामला जाणाऱ्यांची सोय होईलच, शिवाय वाहतूकदारांनाही गर्दीतून न जाता बायपासला जाण्यास मदत होईल. याबाबत आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे.

Web Title: nashik news amardhan condition