नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पुलाखाली सापडली काडतुसे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक वाय. ए. देवरे यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकारी, दहशतवादविरोधी पथक व बीडीडीएस कळविली. काडतुसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकांच्या काडतुसांचा समावेश आहे.

नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वासळी गावाजवळील नासर्डी नदीवरील पुलाखाली जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासळी गावच्या सरपंचांनी सातपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन काडतुसांचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांच्या साठ्यामध्ये 212 जिवंत काडतुसे व 56 पुंगळ्या आहेत. प्लॅस्टिक कॅरिबॅगमध्ये ही सर्व काडतुसे भरण्यात आली होती.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक वाय. ए. देवरे यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकारी, दहशतवादविरोधी पथक व बीडीडीएस कळविली. काडतुसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकांच्या काडतुसांचा समावेश आहे.

Web Title: Nashik news ammunation found in nashik