अंगणवाडी दुरुस्तीसाठीही निधी खर्च करण्यास परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

नाशिक - शासनस्तरावर अंगणवाडी दुरुस्तीसाठी निधी देण्याची तरतूद नसल्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडक्‍या व गळक्‍या इमारतींमध्ये अंगणवाडीतील मुलांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत होते. यंदा अंगणवाडी दुरुस्तीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात आल्यामुळे आता अंगणवाडी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून पुढील तीन वर्षांमध्ये अडीच हजार अंगणवाड्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी दिली. 

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची तरतूद नव्हती. पण अनेक ठिकाणच्या अंगणवाड्या नादुरुस्त असूनही जिल्हा परिषदेला काही उपाययोजना करता येत नव्हत्या. स्थायी समिती, सर्वसाधारण सभा येथे बऱ्याचदा सदस्य नादुरुस्त अंगणवाड्यांचा विषय उपस्थित करत पण तरतूद नसल्याचे कारण सांगून प्रशासन हतबलता व्यक्त करीत असे. आता अंगणवाडी दुरुस्तीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करून निधीही मंजूर केल्यामुळे जिल्हा परिषदेला अंगणवाडी इमारतींची डागडुजी करणे तसेच स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. 

कामाला गती मिळणार 
अंगणवाडी दुरुस्तीसाठी एक लाख रुपये निधी मिळणार आहे. त्यात स्वच्छतागृह उभारण्यासाठी चाळीस हजार रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाकडून अंगणवाड्यांसाठी मंजूर झालेल्या निधीतून 50 टक्के खर्च नवीन अंगणवाड्या बांधण्यासाठी व उर्वरित निधी दुरुस्तीसाठी खर्च करता येणार आहे, असे सभापती अपर्णा खोसकर यांनी सांगितले.

Web Title: nashik news anganwadi fund