नाशिक ॲटलस कॉप्कोचे इपिरॉक इंडियात रूपांतर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

सातपूर - बांधकाम, खाणकाम उद्योगाला लागणाऱ्या हेवी टुल्सच्या उत्पादनात जगात आघाडीवर असलेल्या ॲटलस कॉप्कोची उपकंपनी इपिरॉक ही नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात अग्रणी आहे. या उपकंपनीच्या विस्तारासाठी नाशिकचा ॲटलसचा प्रकल्प इपिरॉककडे वर्ग करण्यात आला. पुण्यात नाशिक प्रकल्पाचे सरव्यवस्थापक चंद्रशेखर पंडित यांच्या उपस्थितीत इपिरॉकचे व्यवस्थापकीय संचालक जेरी अँडरसन यांनी ही घोषणा केली. नाशिकच्या प्रकल्पाचे नाव यापुढे इपिरॉक इंडिया राहील. निर्यात दुप्पट करण्याची योजना आखताना टप्प्याटप्प्याने शंभर कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाणार आहे.  

कधी काळी सीपी टुल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील कंपनीला ॲटलस कॉप्को या स्वीडिश कंपनीने ताब्यात घेतले. आता या कंपनीचे इपिरॉक या नवीन कंपनीत रूपांतर झाले आहे. बॉश, महिंद्र या कंपन्यांइतका पगार ॲटलस कॉप्कोच्या कामगारांना मिळतो. गेल्या सहा महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने मोठी गुंतवणूक करून नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादन विकसित करण्याचे काम नाशिकमध्ये सुरू आहे. त्यासाठी इपिरॉक या कंपनीत नाशिक प्रकल्प वर्ग करण्यात आल्याची घोषणा जेरी अँडरसन यांनी केली. आतापर्यंत नाशिकमध्ये दहा कोटींची गुंतवणूक केली असून, अजून टप्प्याटप्प्याने शंभर कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीची घोषणाही त्यांनी या वेळी केली. नुकताच ॲटलसच्या जागी इपिरॉकच्या नावाचा फलक कंपनीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला. 

नाशिकमधील कंपनीचे उत्पादन पूर्णपणे निर्यात होत असून, जगातील खाणकाम, पायाभूत सुविधांतील गुंतवणुकीमुळे कंपनीच्या उत्पादनात वाढ होत आहे. जगातील अनेक देशांतील सरकारी कंपन्या ग्राहक आहेत. यापुढे ॲटलस व इपिरॉकचे व्यवसायाचे मार्ग वेगवेगळे राहणार आहेत. गेल्या १४४ वर्षांत ॲटलसने जगात गुणवत्तेच्या जोरावर जो दबदबा निर्माण केला, त्याच धर्तीवर इपिरॉकची वाटचाल राहील. इपिरॉकचा हैदराबादला आणखी एक प्रकल्प असून, तंत्रज्ञान विकास केंद्र बेंगळुरूला आहे.

नाशिक प्लान्टचे नाव बदलण्यात आले असून, यामुळे कंपनीने अनेक विकासकामे हाती घेतली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून कंपनीत मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. त्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रे बसविली जात आहेत. जसजसे बांधकाम पूर्ण होत आहे तसतसे यंत्रांच्या फिटिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामगारांनाही नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगाराच्या संधी आहेत. जागतिक पातळीवरील मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व कामगारांत उत्साहाचे वातावरण आहे.

Web Title: nashik news Atlas Copco