पदयात्रेतून अवयवदानाविषयी जागृती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नाशिक - जागतिक अवयवदान दिनानिमित्त साधून इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) व रोटरी क्‍लब ऑफ नाशिकतर्फे पदयात्रा काढण्यात आली. डॉक्‍टर, वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांनी फलक, घोषणाबाजीतून अवयवदान करण्याचे आवाहन केले. पंचवीस किलोमीटरच्या पदयात्रेची सुरवात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठापासून झाली, तर आरोग्य विज्ञान विद्यापीठात समारोप झाला.

रॅलीचे संयोजन केअर क्‍लिनिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केले. मुक्‍त विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र वडनेरे, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, रोटरीचे माजी प्रांतपाल देशमुख, रोटरी क्‍लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनिवाल, केअर क्‍लिनिकचे डॉ. अनिरुद्ध ढोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा सुरू झाली. 

मोतीवाला वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. तुलसी आय हॉस्पिटल, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, अपोलो हॉस्पिटलने पदयात्रेत माहितीपत्रके वाटून अवयवदानाचे अर्ज भरून घेतले. त्यातून उपस्थितांच्या मनात अवयवदानाविषयी भावनात्मक पैलू जागृत झाला. काही दिवसांपूर्वी अपघातात मेंदूमृत झालेल्या (कै.) झळके यांच्या कुटुंबीयांसाठी रोटरी क्‍लबतर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले.

‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. थेटे यांनी ‘आयएमए’च्या माध्यमातून वैज्ञानिक, सामाजिक व कायदेशीर बाबींची एकजूट करून सामाजिक संस्था व डॉक्‍टरांनी समाज प्रबोधनाचे कार्य सतत पुढे सुरू राहावे, यासाठी आयएमए हॉल मानवी अवयवदान कक्ष म्हणून कायम उपलब्ध राहील, असे आश्‍वासन दिले. सुनील देशपांडे यांनी अवयवदान जनजागृतीसाठी नागपूरपर्यंतच्या अकराशे किलोमीटर रॅलीचा अनुभव सांगितला. डॉ. अनिरुद्ध ढोकरे, डॉ. हेमंत सोननीस यांनी मनोगत व्यक्‍त केले. पदयात्रेचा समारोपप्रसंगी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते पहिल्या २० पदयात्रींचा सत्कार झाला. आरोग्य विद्यापीठाच्या डॉ. विद्या ठाकरे, जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे आदी उपस्थित होते.

Web Title: nashik news Awareness about organism