आमदार बच्चू कडूंनी उगारला महापालिका आयुक्तांवर हात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

नाशिक - राखीव निधीच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मुद्यावरील चर्चेदरम्यान आज आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारला. पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी करत आमदार कडूंना रोखले. मात्र, अपमानित झालेल्या आयुक्तांनी तत्काळ दालन सोडले. या वेळी कार्यकर्त्यांनी आयुक्तांविरुद्ध घोषणाबाजी केल्याने तणाव वाढला होता. दरम्यान, उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांच्या फिर्यादीनुसार आमदार कडू यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिक - राखीव निधीच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मुद्यावरील चर्चेदरम्यान आज आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारला. पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी करत आमदार कडूंना रोखले. मात्र, अपमानित झालेल्या आयुक्तांनी तत्काळ दालन सोडले. या वेळी कार्यकर्त्यांनी आयुक्तांविरुद्ध घोषणाबाजी केल्याने तणाव वाढला होता. दरम्यान, उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांच्या फिर्यादीनुसार आमदार कडू यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना शहरात सुरू असलेल्या एका कार्यक्रमातून अटक करून, न्यायालयात हजर केले असता त्यांची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली. 

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार कडू व महापालिका आयुक्त यांची आज दुपारी महापालिकेत राखीव निधीच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू होती. अंदाजपत्रकातील एकुण निधीच्या तीन टक्के राखीव निधी ठेवण्याचा कायदा होऊनही महापालिकेने आतापर्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी न केल्याच्या मुद्यावर चर्चेला वेगळे वळण लागले व त्यातून आमदार कडू यांनी आयुक्त कृष्णा यांना शिवीगाळ करत हात उगारला. 

"अपंगांचा तीन टक्के निधी खर्च झाला नाही एवढाच विषय होता. परंतु, चुकीच्या पद्धतीने विषय हाताळला. अपंगांच्या मागण्या दुर्लक्षून त्यांची हेळसांड होत आहे. कितीही गुन्हे दाखल होऊ द्या, फिकीर नाही. अपंगांसाठी जीवसुद्धा देईन.' 
 बच्चू कडू, आमदार 

"अपंगांच्या न्याय्य हक्कांबाबत महापालिका संवेदनशील आहे. त्यामुळेच विविध योजना राबविल्या. परंतु, अपंगांच्या मागण्या पुढे करून कुणी प्रशासनावर दबाव टाकत असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. हा सर्व पब्लिसिटी स्टंट आहे. 
अभिषेक कृष्णा, आयुक्त, महापालिका 

Web Title: nashik news Bacchu Kadu MLA Municipal Commissioner