राज्य बालसाहित्य संमेलन नाशिकमध्ये शनिवारपासून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

नाशिक - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन शनिवारी (ता. 16) व रविवारी (ता. 17) नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या धामणकर सभागृहात होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, काव्यसंमेलन, दीर्घांक, साहित्य फुलदाणी, प्रेरणा लेखन प्रतिभेची, प्रवास ज्ञानपीठाचा-रंगमंच आविष्कार असे विविध कार्यक्रम होतील. 

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त होणाऱ्या या संमेलनाची सुरवात शनिवारी (ता. 16) सकाळी ग्रंथदिंडीने होईल. दुपारी तीनला संमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी बालकवींचे काव्यसंमेलन आणि ना. धो. ताम्हणकर लिखित कलाकृतीवर "गोट्या' हा दीर्घांक सादर होणार आहे.  

रविवारी (ता. 17) सकाळी साहित्य फुलदाणी हा कार्यक्रम होईल. यात माधुरी माटे, एकनाथ आव्हाड, किशोर पाठक आणि राजीव तांबे हे सहभागी होतील. त्यानंतर प्रेरणा लेखन प्रतिभेची या कार्यक्रमात पृथ्वीराज तौर हे कथा या विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच अनंत भावे हे कविता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी प्रवास ज्ञानपीठाचा या कार्यक्रमात ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी साहित्यिकांच्या साहित्यकृतीवर आधारित कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर राजीव तांबे यांच्या मार्गदर्शनाने या संमेलनाचा समारोप होईल.

Web Title: nashik news bal sahitya sammelan