ठराविक मर्यादेनंतरच्या बॅंकिंग सेवेत तीन टक्‍क्‍यांनी वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

नाशिक - देशभरात विविध बॅंकांकडून मिळणाऱ्या सेवांमध्ये लागणाऱ्या सेवाकरात आज मध्यरात्रीपासून तीन टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली आहे. आता 15 ऐवजी 18 टक्के सेवाकर ग्राहकाला मोजावा लागणार आहे. हा कर ठराविक सेवांना ठराविक मर्यादा पार केल्यानंतरच मोजावा लागणार आहेत. या संदर्भातील बदल उद्यापासून (ता. 1 जुलै) प्रत्येक बॅंकेत होतील, असे राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

देशातील राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून धनादेश पुस्तक, एटीएम, रोख रक्कमेचा भरणा, धनाकर्ष (बॅंक ड्राफ्ट), नेफ्ट आरटीजीएस, कर्ज प्रोसेसिंग फी, बॅंकेकडून मिळणारे विविध प्रकारचे दाखले, अकाऊंट मेंटेन्स चार्जेस आदी सेवा दिल्या जातात. यात बचत व करंट खात्यांसाठी काही सवलती ग्राहकांना दिल्या गेल्या आहेत. या दिल्या जाणाऱ्या सवलतींव्यतिरिक्त ग्राहकाने अधिकची सेवा घेतली तर त्यास पूर्वी 15 टक्के सेवा कर द्यावा लागत होता. शुक्रवारी (ता. 30) मध्यरात्रीनंतर 18 टक्के सेवाकर ग्राहकास द्यावा लागणार आहे.

Web Title: nashik news bank

टॅग्स