भंडारदरा परिसर ठरतोय पर्यटकांसाठी पर्वणी

भंडारदरा परिसर ठरतोय पर्यटकांसाठी पर्वणी

इगतपुरी - भंडारदरा धरणाच्या मुख्य भिंतीच्या व्हॉल्व्हद्वारे वर्षभरात प्रथमच विसर्ग सोडण्यात आल्याने धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या बगीचा परिसरातील वातावरणात थंडाव्याचा सुखद शिडकावा होत आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हाला कंटाळलेले पर्यटक तेथे आकर्षित होताहेत.

गेल्या काही दिवसांपासून विद्युतगृह क्रमांक १ द्वारे सोडण्यात आलेला विसर्ग बंद झाल्यामुळे धरणाच्या मुख्य भिंतीच्या व्हॉल्व्हद्वारे ६२१ क्‍यूसेक व वायपीएसद्वारे ३९४ क्‍यूसेकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. तो निळवंडे धरणात जमा होईल. विसर्ग किमान पाच ते सहा दिवस सुरू राहण्याची शक्‍यता आहे.

सध्या सुरू असलेल्या विसर्गासाठी साधारण ६०० दशलक्ष घनफूट पाणी खर्ची होऊन एक हजार ६०० ते एक हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहील. धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे रखरखत्या उन्हाळ्यातदेखील प्रचंड गारवा पर्यटक अनुभवताहेत. धबधब्याचे मनमोहक सौंदर्य भंडारदरा परिसरात सध्या सुरू असलेल्या काजवा महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरत आहे. त्यातच सुट्यांमुळे पर्यटकांची झुंबड उडालेली पाहावयास मिळते. केवळ पावसाळ्यातच दिसणारे धबधबे उन्हाळ्यात पाहावयास मिळत असून, सोबत काजवा महोत्सव, असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने पर्यटक मनमुराद आनंद घेताहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com