बिल्डर असोसिएशनच्या बैठकीत निविदांवर बहिष्काराचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नाशिक - बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेतर्फे नाशिक प्रादेशिक विभागातील ठेकेदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सरकारी कामांच्या निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. चालू कामांवर मूल्यवर्धित कर (व्हॅट) वगळता जीएसटी वेगळा देण्यात यावा.

यापुढील सर्व निविदांच्या देयकांमध्ये प्रचलित जीएसटी दर वेगळा लावून द्यावा. केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्याची एकत्रित दर सूची करावी. सरकारच्या नवीन निर्णयानुसार रद्द केलेले भाववाढ कलम आणि कलम 38 हे पूर्ववत निविदेमध्ये समाविष्ट करावे, आदी मागण्या बैठकीमध्ये करण्यात आल्या.

बैठकीस असोसिएशनच्या नाशिक शाखेचे गोपाल अटल, शीतल नवले (धुळे), नाना कदम (नगर), संजय आबा पाटील (जळगाव), के. के पटेल (शहादा), के. के. थोरात (संगमनेर) यांच्यासह सुशिक्षित बेरोजगार अभियंता, जिल्हा ठेकेदार, जिल्हा मजूर बांधकाम सहकारी संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

Web Title: nashik news bilder association boycott on tender