दारू दुकानांच्या परवानाप्रश्‍नी भाजप ‘बॅकफुट’वर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

पक्षाचेच मंत्री असतानाही आमदारांचे काही चालेना

नाशिक - दारू दुकानांच्या परवान्यांना स्थानिकांकडून होत असलेल्या विरोधाला त्र्यंबकेश्‍वरच्या साधू-महंतांनी कृतिशील साथ दिली.  भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांनी स्थानिकांच्या विरोधाच्या सुरात सूर मिसळला आहे. पण पालकमंत्री गिरीश महाजन, उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख हे भाजपचे मंत्री असतानाही आमदारांचे काही चालत नाही, असे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे भाजप सद्यःस्थितीत ‘बॅटफुट’वर गेला आहे.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची लंबोदर ॲव्हेन्यूमधील महिलांनी भेट घेतल्यानंतर डॉ. भामरे यांनी दारू दुकानाच्या परवान्याचे प्रकरण गांभीर्याने घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांचा विरोध लक्षात घेण्याचे सुचविले होते. रविशंकर मार्गावरील महादेव पार्क आणि दिंडोरी रस्त्यावरील दारू दुकानाविरोधात स्थानिकांनी विरोध दर्शविला. मात्र, प्रशासनापर्यंत स्थानिकांचाच नव्हे, तर लोकप्रतिनिधींचा आवाज पोचतो की नाही, असा प्रश्‍न आता शहरवासीयांत निर्माण झाला आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
पालकमंत्री गिरीश महाजन उद्या (ता. १९) शहरात आहेत. या पार्श्‍वभूमीवर दारू दुकानाला विरोध करणाऱ्या नागरिकांनी भाजप आमदारांच्या भेटी घेत न्याय मिळवून द्यावा, असा आग्रह धरला. त्यामुळे आमदारांच्या गाऱ्हाण्याला पालकमंत्र्यांकडून नेमका कसा प्रतिसाद मिळतो याबाबत लक्ष लागले आहे. कायद्याचा कीस काढत बसण्याचे धोरण कायम ठेवल्यास पोलिसांच्या कामात वादाची नव्याने भर पडणार आहे. महापालिकेतील सत्ताकेंद्रातून उडालेल्या गोंधळामुळे आणि दारू दुकानाच्या परवान्याविरोधातील आंदोलनामुळे भाजपवर नामुष्की ओढवण्याची शक्‍यता अधिक आहे. काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित, काँग्रेसच्या प्रवक्‍त्या डॉ. हेमलता पाटील यांनी यापूर्वी दारू दुकानाला विरोध करणाऱ्यांची बाजू लावून धरली आहे. अशा परिस्थितीत परवान्यांबाबत स्पष्ट धोरण स्वीकारले न गेल्यास विरोधकांना आगपाखड करण्यासाठी संधी चालून येणार आहे.

उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून परवान्यांना मान्यता देत असताना कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणेला विचारात घ्यायला हवे. यासंबंधाने आपण पत्र दिले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा विषय लक्षात घेऊन दारू दुकानांच्या परवान्यांबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांना साकडे घातले जाणार आहे.
- आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप

Web Title: nashik news bjp backfoot for wine shop permission issue