ही तर फक्त भाजपची चमकोगिरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नाशिक - स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक दाखल होण्यापूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फे चार दिवसांपासून अस्वच्छतेची पाहणी केली जात आहे. परंतु शिवसेनेला ही भाजपची चमकोगिरी वाटत असून, त्यात कदापि सहभागी होणार नसल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. कायमस्वरूपी स्वच्छता झाली असती तर शिवसेनेने आनंदाने सहभाग घेतला असता, परंतु स्वच्छतेसाठी आम्ही काही तरी करीत आहोत, याचाच हा देखावा असल्याची टीका त्यांनी केली.

भाजपतर्फे गुरुवार (ता. ४)पासून स्वच्छतेची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत. महापौर, उपमहापौरांसह पदाधिकाऱ्यांचा लवाजमा अचानक एखाद्या भागाला भेट देऊन तेथील अस्वच्छतेबाबत प्रशासनाला धारेवर 
धरत आहे. 

स्वच्छतेची पाहणी करून प्रशासनाला सूचना देणे चांगला उपक्रम असला तरी, हा उपक्रम एकतर महिनाभरापूर्वी अथवा केंद्रीय पथकाच्या भेटीनंतर राबविण्याची आवश्‍यकता होती. परंतु ऐन परीक्षेच्या वेळी अभ्यास करून सत्ताधारी भाजप दिखावा करत आहे. भाजपचे जे नगरसेवक सकाळी पाहणी करण्यासाठी महापौरांच्या लवाजम्यासोबत जातात. त्यांच्याच प्रभागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. महापालिकेत सत्ता येऊन दहा महिने उलटले तरी अजून स्वच्छतेवर देखील काम करता आले नाही. आता प्रशासनावर अविश्‍वास दाखवून सत्ताधारी काय साध्य करणार आहे, असा सवाल बोरस्ते यांनी उपस्थित केला.

सारेकाही मुख्यमंत्र्यांसाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छतेत नाशिक पहिल्या दहांत येईल, अशी ग्वाही दिली होती. परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाची एकूणच तयारी पाहता पहिल्या दहामध्ये नाशिक येण्याची अजिबात शाश्‍वती दिसत नाही. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यातूनसुद्धा ही बाब अधोरेखित होत आहे. परंतु दस्तुरखुद मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे व सत्ताधारी म्हणून स्वच्छतेसाठी प्रयत्न केल्याचे दाखविण्यासाठी शहरात अस्वच्छतेची पाहणी केली जात असल्याची आरोग्य विभागात चर्चा आहे.

Web Title: nashik news bjp shivsena politics