बनावट नोटा प्रकरणातील फरारी संशयित कुमावत जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

नाशिक - शंभर रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणातील फरारी संशयित अण्णा कुमावत याला गुन्हे शाखेने आज (ता. 4) जेल रोड परिसरात जेरबंद केले. गेल्या दोन दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. कुमावत याला न्यायालयाने गुरुवार (ता. 6)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गुन्हे शाखेच्या युनिट-1 च्या पथकाने गेल्या शनिवारी रात्री दहाला पाथर्डी फाटा येथे सापळा रचून शंभर रुपयांच्या बनावट एक हजार 702 नोटांसह चौघांना अटक केली होती. कुमावत हा वाडीवऱ्हे येथून फरारी झाला होता. गुन्हे शाखेच्या एका पथकाने खर्डी, शहापूर येथे जाऊन त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशीही केली होती. तो जेल रोड परिसरातील नातलगाकडे लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी जेल रोड परिसरात सापळा रचून त्याला अटक केली.

Web Title: nashik news bogus currency case kumavat arrested

टॅग्स