बेवारस बॉक्‍समध्ये बाँबच्या संशयाने धावपळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

जुने नाशिक - सांगली बॅंक सिग्नल परिसरात बाँबसदृश बॉक्‍स आढळल्याने बाँबशोध आणि नाशक पथकास पाचारण करण्यात आले. पथकाने बॉक्‍सची तपासणी केल्यानंतर बाँब नसल्याचे आढळताच सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

जुने नाशिक - सांगली बॅंक सिग्नल परिसरात बाँबसदृश बॉक्‍स आढळल्याने बाँबशोध आणि नाशक पथकास पाचारण करण्यात आले. पथकाने बॉक्‍सची तपासणी केल्यानंतर बाँब नसल्याचे आढळताच सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

सांगली बॅंक सिग्नल परिसरात आज दुपारी साडेबाराला बेवारस बॉक्‍स असून, त्यामधून काळी पावडर बाहेर पडल्याचे निदर्शनास आले. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षेस कळविताच बाँबशोध व नाशक पथकास कळविण्यात आले. पथकाने घटनास्थळी बॉक्‍सची संपूर्ण तपासणी केली असता त्यात प्रिंटरच्या टोनरसाठी लागणारी काळी पावडर असल्याचे सांगितले. परिसरात संगणक साहित्य विक्रीचे दुकान असून, दुकानाच्या मालकाने काल (ता. २१) रात्री दुकानाची स्वच्छता करून टोनरमधील नको असलेली काळी पावडर बॉक्‍समध्ये भरून दुकानाबाहेर ठेवली.

सकाळी भंगार वेचणाऱ्या वृद्ध महिलेने बॉक्‍स नेला. परंतु, त्यात भंगार न मिळाल्याने तो बॉक्‍स तेथेच सोडून दिला. आज दुपारी बॉक्‍समधून काळी पावडर बाहेर पडल्याने त्यात काही बाँबसदृश वस्तू तर नाही ना, या भीतीने परिसरात गोंधळ उडाला.

Web Title: nashik news bomb suspicion