बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचे सोमवारपासून नाशिकला अधिवेशन

बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचे सोमवारपासून नाशिकला अधिवेशन

नाशिक - गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगरीत येत्या सोमवार (ता. 25) पासून बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचे बारावे अधिवेशन होत आहे. गोखले एज्युकेशन संस्थेच्या शतकपूर्ती महोत्सवाचे औचित्य साधून हे अधिवेशन होत आहे. एकेकाळी संस्कृत भाषेच्या अध्ययनाचे केंद्र असलेल्या या महाविद्यालयात अनेक दशकांनंतर अधिवेशनच्या निमित्ताने पुन्हा एकदा विद्वानांची मांदियाळी भरणार आहे.

अधिवेशनाचे उद्‌घाटन सोमवारी सकाळी साडेदहाला संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते होईल. आयआयटी मुंबईच्या मानवविद्या शाखेतील सहयोगी प्राध्यापक डॉ. मल्हार कुलकर्णी प्रमुख पाहुणे असतील. अधिवेशनात वेद आणि अवेस्ता, व्याकरण आणि भाषाशास्त्र, अभिजात साहित्य, धर्म आणि तत्त्वज्ञान, इतिहास आणि पुरातत्त्व विभाग, प्राचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान, नाशिक-इतिहास आणि संस्कृती या विषयांवर देशातील 200 प्रतिनिधी चर्चा करतील, अशी माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी अधिवेशनात प्राच्यविद्या परिषदेचे कार्याध्यक्ष भांडारकर इन्स्टिट्यूटचे डॉ. गणेथ थिटे, डेक्कन विद्यापीठाचे डॉ. प्रसाद जोशी, वाईच्या डॉ. अंजली पर्वते, मुंबई विद्यापीठाचे डॉ. साहेबराव निगळ, पुरातत्त्व आणि संग्रहालय विभाग मुंबईचे संचालक डॉ. तेजस गर्गे, पुणे विद्यापीठाचे प्रा. मिहीर अर्जुनवाडकर, इतिहासाचे प्रा. डी. एम. पठाण, बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचे अध्यक्ष डॉ. एम. के. ढवळीकर, सचिव डॉ. बहुलकर, सहसचिव डॉ. श्रीनंद बापट उपस्थित राहणार आहेत.

राज्य शासनाच्या राजपत्राचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांच्या उपस्थितीत 27 डिसेंबरला दुपारी दोन वाजता अधिवेशनाचा समारोप होईल. गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी अध्यक्षस्थानी असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com