बिल्डर्स असोसिएशनच्या एक्‍सलन्स पुरस्कारासाठी प्रस्तावाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

नाशिक - बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे दर वर्षी बिल्डर्स दिन साजरा केला जाणार असून, त्याअंतर्गत प्रोजेक्‍ट एक्‍सलन्स पुरस्कार दिले जाणार आहेत. संस्थेतर्फे दर दोन वर्षांनी हे पुरस्कार दिले जातात. यंदा भविष्यातील भारत या संकल्पनेवर आधारित स्पर्धा होत आहे. या पुरस्कारामध्ये इमारतीची गुणवत्ता, त्यातील सोयी, दर्जा यांचा विचार करण्यात येतो. त्याचसोबत पर्यावरणपूरक बांधकाम ही संकल्पना स्पर्धेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी दोन स्वतंत्र तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. १७ फेब्रुवारीला हॉटेल ताजमध्ये पुरस्कारांचे वितरण होईल.

नाशिक - बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे दर वर्षी बिल्डर्स दिन साजरा केला जाणार असून, त्याअंतर्गत प्रोजेक्‍ट एक्‍सलन्स पुरस्कार दिले जाणार आहेत. संस्थेतर्फे दर दोन वर्षांनी हे पुरस्कार दिले जातात. यंदा भविष्यातील भारत या संकल्पनेवर आधारित स्पर्धा होत आहे. या पुरस्कारामध्ये इमारतीची गुणवत्ता, त्यातील सोयी, दर्जा यांचा विचार करण्यात येतो. त्याचसोबत पर्यावरणपूरक बांधकाम ही संकल्पना स्पर्धेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी दोन स्वतंत्र तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. १७ फेब्रुवारीला हॉटेल ताजमध्ये पुरस्कारांचे वितरण होईल. पुरस्काराच्या निमित्ताने राज्यस्तरीय परिषद होणार आहे. 

नाशिकचा वाढता विकास लक्षात घेऊन हॉटेल व रिसोर्टस तसेच औद्योगिक बांधकामे या दोन नव्या श्रेणी घोषित करण्यात आल्या आहेत. पुरस्कारांसाठी १९ जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेल्या इमारतींना स्पर्धेत सहभागी करून घेता येतील, अशी माहिती बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल अटल यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी अध्यक्ष विलास बिरारी, रामेश्‍वर मलाणी, सचिव अरविंद पटेल, दीपक धारराव, मनोज खांडेकर, राहुल सूर्यवंशी, राजेंद्र मुथा, निशित अटळ आदी उपस्थित होते.

पुरस्कारामध्ये शासकीय इमारती, आठ हजार चौरस मीटरपर्यंतचे समूह प्रकल्प, व्यावसायिक प्रकल्प, संस्थात्मक प्रकल्प, हाउसिंग प्रोजेक्‍ट आठ हजार चौरस मीटर पुढील समूह गृह प्रकल्प या श्रेणी आहेत.

Web Title: nashik news Builders Association