महिंद्रच्या आवारात साकारले फुलपाखरू उद्यान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नाशिक - महिंद्र ऍन्ड महिंद्र कंपनीच्या आवारात फुलपाखरू उद्यान साकारण्यात कंपनीचे अधिकारी सतीश गोगटे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, 30 जातींच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे. महिंद्र समूहाचे नियंत्रक सुधारणाप्रमुख अनिर्बन घोष, कविता घोष आणि वैशाली आहेर यांच्या हस्ते उद्यानाचे उद्‌घाटन झाले. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हिरामण आहेर या वेळी उपस्थित होते. 

नाशिक - महिंद्र ऍन्ड महिंद्र कंपनीच्या आवारात फुलपाखरू उद्यान साकारण्यात कंपनीचे अधिकारी सतीश गोगटे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, 30 जातींच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे. महिंद्र समूहाचे नियंत्रक सुधारणाप्रमुख अनिर्बन घोष, कविता घोष आणि वैशाली आहेर यांच्या हस्ते उद्यानाचे उद्‌घाटन झाले. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हिरामण आहेर या वेळी उपस्थित होते. 

फुलपाखरू... रंगांची उधळण करणारा कीटक. देशातील फुलपाखरांची संख्या 20 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. निसर्गाची हानी हे त्यामागील कारण आहे. अशा या फुलपाखरांच्या संवर्धनासाठी पक्षीमित्र गोगटे यांनी उद्यानासाठी दोन महिने परिश्रम घेतले. या उद्यानाला राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून सन्मान मिळालेल्या राणी पाकोळी या नावाने "ब्लू मॉरमॉन बटरफ्लाय गार्डन' असे नाव दिले. जीन अलेक्‍झांड्रिया हे जगात आढळणारे सर्वांत मोठे अन्‌ वेस्टर्न पिगमी ब्लू हे सर्वांत लहान फुलपाखरू. देशात सुमारे दीड हजार जातींचे फुलपाखरं आढळतात. त्यापैकी राज्यात 350 आणि नाशिकमध्ये दीडशेहून अधिक जाती दिसतात. श्री. गोगटे यांनी उद्यानामध्ये 30 जातींच्या फुलपाखरांची नोंद केली आहे. कंपनीत काम करताना इथेच जैव विविधता उद्यान बनवायचे, असा विचार केला आणि त्यांनी कंपनीची परवानगी घेऊन एक जागा निश्‍चित केली. 

श्री. गोगटे यांनी बी.एन.एच.एस. संस्थेचा फुलपाखरांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रत्येक फुलपाखराचे एक विशिष्ट झाड असते. त्यावर ते अंडी घालतात. अशी 20 ते 25 झाडे लावली. 25 फुटांचे एक वर्तुळ बनविले. त्यामध्ये विशिष्ट अंतर सोडून रोपे लावली. मध्यभागी चिखलाचा भाग करून "मड पडलिंग'साठी फुलपाखरांना ते आवश्‍यक असते, तसेच एक फळांचे टेबल बनविले. विविध फळे त्याच्यावर ठेवली. अनेक फुलांची रोपेदेखील लावली. फुलपाखरांचे जीवनचक्र समजावून घेण्यासाठी या बागेला विशेष महत्त्व आहे. नाशिकमध्ये फुलपाखरांना कुठेही बंदिस्त न करता खुल्या जागेत असा फुलपाखरांच्या संवर्धनासाठी केलेला पहिला प्रयोग आहे. 

फुलपाखरांना ज्या वनस्पती अंडी देण्यासाठी आवश्‍यक आहे, त्या लावून त्यांना खाद्य उपलब्ध करून सूर्यप्रकाश, आर्द्रताचा देखील मी विचार केला आहे. एका फुलपाखराचे पूर्ण वर्तुळ अभ्यास करण्याची संधीदेखील मला या निमित्ताने मिळाली आहे. 
- सतीश गोगटे, पक्षीमित्र 

Web Title: nashik news Butterfly garden