महापालिकेतर्फे आजपासून अपंग सर्वेक्षणाची विशेष मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नाशिक - महापालिकेतर्फे अपंगांच्या सर्वेक्षणासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. अपंग सर्वेक्षणाची मोहीम वैद्यकीय विभागातर्फे बुधवार (ता. 27) ते शुक्रवारपर्यंत राबविली जाणार आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये मोहीम राबविण्यात आली होती. त्यात घरोघरी जाऊन अपंगांचे सर्वेक्षण केल्याचा दावा करण्यात आला होता. सर्वेक्षणात सिव्हिल सर्जनकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर न झालेले साडेसात हजार अपंग व्यक्ती आढळल्या होत्या. 40 टक्के अपंग असलेल्या अपंगांना शासन धोरणाप्रमाणे अपंगत्वाचा लाभ द्यायचा असल्याने पालिकेतर्फे विभागनिहाय शिबिर घेण्यात येत आहे. उद्या (ता. 27) पूर्व व पश्‍चिम विभागासाठी कथडा येथील डॉ.

नाशिक - महापालिकेतर्फे अपंगांच्या सर्वेक्षणासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. अपंग सर्वेक्षणाची मोहीम वैद्यकीय विभागातर्फे बुधवार (ता. 27) ते शुक्रवारपर्यंत राबविली जाणार आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये मोहीम राबविण्यात आली होती. त्यात घरोघरी जाऊन अपंगांचे सर्वेक्षण केल्याचा दावा करण्यात आला होता. सर्वेक्षणात सिव्हिल सर्जनकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर न झालेले साडेसात हजार अपंग व्यक्ती आढळल्या होत्या. 40 टक्के अपंग असलेल्या अपंगांना शासन धोरणाप्रमाणे अपंगत्वाचा लाभ द्यायचा असल्याने पालिकेतर्फे विभागनिहाय शिबिर घेण्यात येत आहे. उद्या (ता. 27) पूर्व व पश्‍चिम विभागासाठी कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात, सिडको विभागासाठी गुरुवारी (ता. 28) मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय व सातपूर विभागासाठी मायको प्रसूतिगृह येथे, तर शुक्रवारी (ता. 29) पंचवटी विभागासाठी इंदिरा गांधी रुग्णालय व नाशिक रोड विभागासाठी उपनगर येथील प्रसूतिगृहात सर्वेक्षण केले जाणार आहे. अपंगांनी शिबिरात येऊन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावी. शिबिराला हजेरी लावताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक असल्याचे आवाहन वैद्यकीय विभागाकडून केले आहे. 

Web Title: nashik news campaign for disabled survey

टॅग्स