सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी ७७६ ठिकाणे निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नाशिक - स्मार्ट ॲन्ड सेफ्टी शहर साकारण्याचा भाग म्हणून शहरात दिवाळीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. राज्य शासनाच्या महाआयटी विभागाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. महापालिका व पोलिस विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात ७७६ ठिकाणी तीन हजार ११५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यासाठी तीनशे कोटी रुपये अपेक्षित आहेत. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात निविदाप्रक्रिया राबवली जाण्याची शक्‍यता आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी व्यक्त केली.

माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा उपयोग करण्याचा एक भाग म्हणून संपूर्ण शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली आणले जाणार आहे. या माध्यमातून नियंत्रण कक्षातून शहरात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटनांवर नजर ठेवून नियंत्रण आणले जाणार आहे. स्मार्टसिटीअंतर्गत पोलिस विभागाकडून ज्याप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याच जोडीला महापालिकेने स्वमालकीच्या मालमत्तांसह शहराच्या महत्त्वपूर्ण भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पोलिस व महापालिकेतर्फे स्वतंत्र सर्वेक्षण करण्यात आले. दोन्ही विभागांचा मिळून सर्वेक्षण अहवाल शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला सादर करण्यात आला. त्यात शहरातील ७७६ ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाणावर तीन हजार ११५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यासाठी तीनशे कोटींचा खर्च येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच कमांड कंट्रोल सेंटर व ऑप्टिकल फायबर केबलच्या खर्चाचाही समावेश आहे. महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर नियंत्रण कक्ष तयार केला जाईल.

दिवाळीत निविदाप्रक्रिया
नागपूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तांत्रिक चुकांमुळे नाशिकमध्ये शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब केला जाणार असून, महाआयटी कंपनीने सर्वेक्षणासाठी मक्तेदाराची नियुक्ती केली आहे. त्यासाठी लिडार तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्याव्यतिरिक्त महापालिकेने यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला पाठविला आहे. सर्वेक्षण अहवालाच्या आधारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे.

Web Title: nashik news cctv camera