शाळेतील गैरप्रकार, चोऱ्या अन्‌ शिक्षक, कर्मचाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

महापालिकेच्या ५० शाळांमध्ये १८१ कॅमेरे; आठ लाखांचा खर्च
नाशिक - महापालिका शाळांमध्ये होणारे गैरप्रकार, चोऱ्या, तसेच विद्यार्थी उपस्थितीसह शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नजर ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे महापालिकेच्या ५० शाळांमध्ये १८१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी आठ लाख १२ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती महासभेत देण्यात आली आहे.

खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकेच्या शाळा आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न होत आहेत. यापूर्वी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा पुरवठा करणे, शाळांची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या उपक्रमांचा समावेश आहे. ई-लर्निंग, ऑडिओ व व्हिज्युअल लर्निंग क्‍लासरुम, संगणक पुरविणे, ॲप्लिकेशन तयार करणे आदी सुविधा पुरविल्या जात आहेत. आता शाळा हायटेक करण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ५० शाळांमध्ये १८१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये सायंकाळनंतर चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. विद्यार्थिनी पळवून नेण्याचे प्रकारही घडले होते. रात्रीच्या वेळी जुगार खेळणे, दारू पिऊन धिंगाणा घालणे आदी प्रकार होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यापार्श्‍वभूमीवर सर्वशिक्षा अभियानाच्या निधीतून सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एका शाळेत तीन ते पाच कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मुख्याध्यापकांचे दालन, शाळेचे मैदान व प्रांगणात कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

या शाळांमध्ये बसणार कॅमेरे
महापालिका शिक्षण विभागाच्या शाळा क्रमांक २९, ७ , १०३, ३, १५, १२, ६२, ५७, ८, १३, ३५, १२६, १२७, १२८, १३१ ते १३४, ७२ व ७३, २८, ३१, १०२, १००, ९६, ७४, ९५, ४, ११, ५३, ४८, ६८, १०५, ११०, ५, १२२, १०, २२, ७५, ८५ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

Web Title: nashik news cctv watch in school