मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित 

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित 

नाशिक - मुंबईतील मेगाब्लॉक आणि वाराणसी येथील लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामाचा परिणाम झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा आज विस्कळित झाली. मेगाब्लॉकमुळे मुंबईला  जाणाऱ्या तीन रेल्वेगाड्या सकाळी रद्द करण्यात आल्या, तर वाराणसीतील कामामुळे तीन दिवस लांबपल्ल्याच्या चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन रेल्वेसेवा विस्कळित झाली. 

मुंबईतील मेगाब्लॉकमुळे शनिवारी मध्यरात्रीपासून सायन व कुर्लादरम्यान पादचारी पुलाचे काम सुरू आहे. शनिवारी (ता. 26) मध्यरात्री साडेअकरापासून सुरू झालेले हे काम आज दुपारपर्यंत सुरू असल्याने रेल्वेसेवा कोलमडली आहे. मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी, पंचवटी आणि गोदावरी या तीन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. मुंबईतील कामांमुळे लांब पल्ल्याच्या अमृतसर, हावडा मेल आणि विदर्भ एक्‍स्प्रेस मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सपर्यंत न जाता दादरपासून माघारी वळविण्यात आल्या. मुंबईला प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या तिन्ही प्रमुख रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे सकाळपासून लोहमार्गावर आज पूर्णपणे शुकशुकाट होता. 

लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द 
मुंबईतील कामाशिवाय वाराणसी येथे लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे चार प्रमुख रेल्वेगाड्यांच्या आठ फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्या, 11060 छापरा लोकमान्य टिळक, 11056 गोरखपूर लोकमान्य टिळक, 11054 आझमगड लोकमान्य टिळक टर्मिनन्स, 15018 गोरखपूर लोकमान्य टिळक या अप आणि डाउन अशा दोन्ही मार्गावरील रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com