चोरीच्या "प्रकाशा'त ऊर्जामंत्र्यांचा दरबार! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नाशिक - वीजग्रहकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे घेतलेला जनता दरबार चोरीच्या प्रकाशात झाल्याची घटना उघडकीस आली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाल्यामुळे, संबंधित वायर आकड्याची नव्हे, तर जनरेटरची होती, असा खुलासा बावनकुळे यांना लगबगीने करावा लागला. 

वीजग्राहकांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी बावनकुळे यांनी राज्यभर जनता दरबाराचा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत 173 ग्राहक मेळाव्यांत 11 हजार 365 तक्रारी ऐकल्यानंतर आज त्यांनी स्वतः जनता दरबार घेतला. मात्र ज्या लॉन्समध्ये जनता दरबार झाला, तेथे चक्क आकडा टाकून वीज घेतली गेल्याचे उघडकीस आले. 

जनता दरबारात तक्रारीचा पाऊस सुरू असतानाच, दुसरीकडे त्याचे व्हिडिओ चित्रीकरण व्हायरल झाल्याने बावनकुळे यांची चांगलीच पंचाईत झाली आणि संबंधित वायर आकड्याची नव्हे, तर जनरेटरची होती, असा खुलासा करीत, त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला. 

नाशिक-पुणे महामार्गावरील इच्छामणी लॉन्स येथे आज सकाळी बावनकुळे यांचा जनता दरबार होता. त्यासाठी महामार्गावरील विजेच्या खांबावरून वीज घेतली होती. पण त्याचे वीजमीटर नसल्याचे लक्षात आल्यावर ऊर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमासाठीच्या आकडे टाकून घेतलेल्या विजेबाबत ओरड झाली. या कार्यक्रमासाठी वीज वाहिनीवर आकडा टाकून वीज घेतलेल्या आकड्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जनता दरबारात तक्रारी ऐकून घामाघूम झालेल्या बावनकुळेंना स्वतःच त्याचा खुलासा करावा लागला. 

आकडे नव्हे; नियमानुसार 
अशी कुठलीही वीजचोरीच झालेली नव्हती. मी स्वतः त्याची खात्री केली. कार्यक्रमाच्या स्थळी विजेची जी व्यवस्था केली होती. त्याचा आराखडा माझ्या हातात आहे. त्यानुसार संबधित खांबावरून जी वीज घेतली त्याचे मीटर आहे. तसेच ज्या वायरबाबत आकडा म्हणून उल्लेख होतो, ती जनरेटरची आहे. विजेची अडचण येऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था असलेल्या जनरेटरच्या त्या वायर आहेत. त्यात विजेची चोरी नाही, असा खुलासा बावनकुळे यांनी केला आहे.

Web Title: nashik news Chandrashekhar Bawankule