कामात सुधारणा न झाल्यास फेरबदल - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नाशिक - सत्तेत असूनही पक्षाचा हवा तसा प्रभाव पडत नाही. उलट बदनामीच होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच त्रस्त झाले. मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कामात सुधारणा न झाल्यास फेरबदलाचे संकेतही त्यांनी दिल्याने भाजप पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नाशिक - सत्तेत असूनही पक्षाचा हवा तसा प्रभाव पडत नाही. उलट बदनामीच होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच त्रस्त झाले. मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कामात सुधारणा न झाल्यास फेरबदलाचे संकेतही त्यांनी दिल्याने भाजप पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

काही महिन्यांपासून भाजपतील सुंदोपसुंदी वाढू लागली आहे. त्याचा परिणाम संघटनात्मक व महापालिकेच्या कामकाजावर दिसू लागला आहे. नाशिकचे पालकत्व घेतलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने कामकाजाचा आढावा घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी काल (ता. ९) रात्री मोजक्‍याच भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना नागपूरचे रस्ते पाहण्याचे निमंत्रण त्यांनी दिले.

रस्त्यासाठी दोनशे कोटी, आकृतिबंधच्या सूचना
नाशिकमधील काँक्रिट रस्त्यांसाठी दोनशे कोटींचा निधी कबूल केल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेचा आकृतिबंध महिनाभरात सादर करण्याच्या सूचना देत मंत्रालयीन पातळीवर कामांच्या फायलींचा निपटारा करण्यासाठी दोन व्यक्तींची नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरात लवकरच सीसीटिव्ही कॅमेरे लागणार असून, त्यासाठी निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती दिली.

टाळी एका हाताने वाजत नाही
पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार बाळासाहेब सानप यांची जवळीक, संघटनेसह महापालिका व अन्य संस्थांवर त्यांची असलेली पकड यामुळे आमदार प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांना हस्तक्षेपसुद्धा करू देत नसल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत करण्यात आल्या. रात्री उशिरा झालेल्या बैठकीत दोन्ही महिला आमदारांनी कैफियत मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एका हाताने टाळी वाजत नसल्याचा उपरोधिक शाब्दिक टोला लगावला. थेट माझ्याकडे कामे घेऊन येण्याचा सल्ला देत आमदार सानप यांच्या वाढत्या वर्चस्वाला सुद्धा धक्का दिला. आमदार सानप यांनी कार्यकर्त्यांची कामे करणे महत्त्वाचे असल्याची भूमिका मांडल्याचे समजते. बैठकीपूर्वी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, माजी आमदार माणिकराव कोकाटे व वसंत गिते यांनी दुपारी भेट घेत चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सूत्रं हलवत भाजप पदाधिकाऱ्यांना मुंबईत बैठकीला बोलवले. भाजपमध्ये तिसरा गट सक्रिय झाल्याची चर्चा आहे.

Web Title: nashik news changes if the work is not improved