कर्जाचे आमिष दाखवून 22 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

नाशिक - कर्जासाठी प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली नाशिकमधील एकाला तब्बल 22 लाख रुपयांना एका महिलेने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात संशयित महिला शीतल मनोहर निकम (रा. भांडूप (प.), मुंबई) हिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मच्छिंद्र मोतीराम शेवाळे (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेवाळे यांचे मित्र किशोर भालेराव यांनी शीतल निकम हिच्याकडून कर्ज घेतले होते. त्यामुळे शेवाळे यांनीही कर्जासाठी तिच्याशी संपर्क साधला. तिने शेवाळे यांची नाशिकमध्येच भेट घेत घेतली. 35 कोटी रुपये कर्ज देण्याची तयारी दाखवित त्यासाठी एक टक्का प्रक्रिया शुल्कापोटी 24 लाख रुपये भरण्याचे तिने सांगितले. यापैकी किशोर भालेराव यांनी 11 लाख रुपये दिले असल्याने उर्वरित रक्कम भरण्याचे सांगितले. त्याप्रमाणे शेवाळे यांनी स्टेट बॅंक ऑफ जयपूर ऍण्ड बिकानेर शाखेत शीतल निकमच्या खात्यात 20 लाख 58 हजार रुपये भरले. तिने पुन्हा पैशांची मागणी केल्याने शेवाळे यांनी दोन लाख एक हजार 725 रुपये पुन्हा भरले. याप्रमाणे 22 लाख 25 रुपये भरले. त्यानंतरही 35 कोटी रुपयांचे कर्जप्रकरण मंजूर होत नव्हते. त्यामुळे शेवाळे यांनी कर्जापोटी भरलेली रक्कम परत मागितली असता, शीतल निकम हिने त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्यामुळे शेवाळे यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: nashik news cheating crime