छगन भुजबळ यांच्यावर सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

वर्धा/नाशिक - माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्यावर केंद्र सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. तसेच शासकीय यंत्रणेकडूनही चुकीचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. असे आरोप अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करत रोष व्यक्त केला. 

येत्या 1 नोव्हेंबरला परिषदेचा 25 वर्धापनदिन असून, त्याचे नियोजन करण्यासाठी आज वर्धा येथे बैठक झाली. संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांच्याविषयी या वेळी चिंता व्यक्त करण्यात आली. परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, उपाध्यक्ष बापू भुजबळ, डॉ. कैलास कमोद, दिलीप खैरे, आमदार जयवंत जाधव, रवींद्र पवार, पार्वतीबाई शिरसाठ, शिवाजी नलावडे, डॉ. डी. एन. महाजन, प्रा. दिवाकर गमे, ऍड. बाबूराव बेलसरे, ऍड. सुभाष राऊत, अंबादास गारुडकर, किशोर कन्हरे, प्रीतिश गवळी, सुशीलकुमार जाधव, डॉ. संजय गव्हाणे, बाळासाहेब कर्डक, मनोज घोडके, विनायक डहाके, नीलकंठ पिसे, दत्ता खरात आदींसह राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, महिला व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी निशुल्क सभासद नोंदणी कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. संघटना आणखी मजबूत करण्यासाठी चर्चा झाली. कार्याध्यक्ष कुदळे, डॉ. कमोद आदींनी मनोगत व्यक्त केले. 

राज्य व केंद्र सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. ती सुरू करून त्यांना लवकरात लवकर द्यावी या मागणीसह परिषदेत संघटनात्मक बदल करून संघटना मजबूत करणे, ओबीसींच्या प्रश्‍नांवर जिल्हा पातळीवर मोर्चे, आंदोलने, निदर्शने करणे याबाबत ठरावही बैठकीत मांडण्यात आले. रौप्यमहोत्सवी मेळावा मराठवाड्यात घेण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. 

Web Title: nashik news chhagan bhujbal