सफाईवाल्यांच्या दांड्या, कचऱ्याचे ढीग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

नाशिक - नववर्षात शहर स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या महापौर रंजना भानसी यांनी आजपासून सुरू केलेल्या कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉट शोधमोहिमेत आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार आढळला. शहराच्या विविध भागांत आढळलेला कचरा, दुभाजकांमधील अस्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, तसेच हजेरी शेडवर २३ सफाई कर्मचाऱ्यांच्या आढळलेल्या गैरहजेरीमुळे महापौरांना स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांचा अल्टिमेटम द्यावा लागला.

केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत नाशिक महापालिकेने यंदा पहिल्या दहा शहरांत येण्याचा संकल्प केला. गेल्या वर्षी १५३ वा क्रमांक आला होता. ४ जानेवारीला शहरात स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण सुरू होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने पहिल्या दहामध्ये येण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. एकीकडे उपाययोजना करताना दुसरीकडे महापौर भानसी यांनी शहरात सकाळी अचानक भेटी देऊन स्वच्छतेची पाहणी करण्याचे ठरविले. आजच्या पहिल्याच दिवशी प्रभाग १ मधील म्हसरूळ भाजीबाजारात पाहणी केली. सफाई कर्मचाऱ्यांकडून भाजीपाल्याचा कचरा साफ न केल्याचे निदर्शनास आले. किशोर सूर्यवंशी मार्ग, पेठ रोड, दिंडोरी रोडवर रस्ता व दुभाजकाच्या मध्यभागी कचरा, वाढलेली झाडे, पावसाळ्याची साचलेली माती आढळली अाहे.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी दोन दिवसांनी पथक येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या पाहणीत गोदाघाटावर अस्वच्छता आढळली. त्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
- रंजना भानसी, महापौर

Web Title: nashik news cleaning employee absent garbage issue